JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / भारत पाकिस्तानला देणार Corona Vaccine; बातमी ऐकून कंगना म्हणाली, आता तिथेही भाजपचं सरकार

भारत पाकिस्तानला देणार Corona Vaccine; बातमी ऐकून कंगना म्हणाली, आता तिथेही भाजपचं सरकार

भारत पाकिस्तानला 45 दशलक्ष कोरोना लसीचे डोस देणार असल्याच्या वृत्तावर कंगनानं (Kangana Ranaut) प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट करत अभिनेत्रीनं म्हटलं, की मोदी जी म्हणत आहेत, की तेदेखील भारताचाच तुटलेला एक भाग आहेत.

जाहिरात

बीएमसी विरुद्ध कंगना अवैध बांधकाम प्रकरण सध्या सिव्हिल कोर्टात असून 25 सप्टेंबरला याबाबतची सुनावणी होणार आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 10 मार्च : अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. अनेकदा कंगनाचे ट्वीट हे चर्चेचा विषय असतात. यासाठी अभिनेत्रीला अनेकदा ट्रोलही व्हावं लागलं आहे, मात्र तरीही कंगना प्रत्येक विषयावर आपलं मत बिनदास्तपणे मांडत असते. आता भारताकडून पाकिस्तानला कोरोना लस (Corona vaccine) पाठवली जाणार असल्याच्या वृत्तावरही अभिनेत्रीनं मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलं - भारत पाकिस्तानला 45 दशलक्ष कोरोना लसीचे डोस देणार असल्याच्या वृत्तावर ट्वीट करत कंगनानं म्हटलं, की “म्हणजे मोदी जी म्हणत आहेत, की तेदेखील भारताचाच तुटलेला एक भाग आहेत. तिथेही लवकरच भाजपचंच सरकार असेल…दहशतवादी माझे नाहीत, मात्र लोकं तर माझेच आहेत…हा हा हा जबरदस्त”

संबंधित बातम्या

भारत शेजारी असलेल्या पाकिस्तानला 45 दशलक्ष कोरोनाचा लसीचा डोस पुरवणार आहे. दोन्ही देशांमध्ये नेहमीच तणावपूर्ण वातावरण असतं. त्यामुळं, या बातमीवर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, अभिनेत्रीच्या प्रतिक्रियेनं सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. नुकतंच कंगनानं असा खुलासा केला होता, की ती हॉलिवूड सिनेमांची दिग्दर्शक बनणार होती. मात्र, क्वीन सिनेमा हीट ठरला आणि तिनं पुन्हा बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री म्हणाली, की जवळपास एका दशकानंतर मला असं म्हटलं गेलं, की मी खूप चांगली कलाकार आहे. मी हा सिनेमा केवळ पैशासाठी केला होता. याच पैशानं मी न्यूयॉर्कच्या फिल्म स्कूलमध्ये गेले. मात्र, क्वीन प्रदर्शित झाला आणि या सिनेमानं माझं आणि भारतीय सिनेमाचं चित्रच बदलून टाकलं. यामुळे महिला केंद्रीत सिनेमाचा जन्म झाला, असंही कंगनानं म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या