JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘पुढच्या महिन्यात भ्रष्टाचाराचं लसीकरण करुया’; Covid Vaccine घेत कमल हासन यांचा टोला

‘पुढच्या महिन्यात भ्रष्टाचाराचं लसीकरण करुया’; Covid Vaccine घेत कमल हासन यांचा टोला

आता कोरोनाला रोखण्याची लस घेऊया अन् पुढच्या महिन्यात भ्रष्टाचाराला रोखणारं लसीकरण करुया; कमल हासन यांनी वाजवलं विधानसभा निवडणूकीचं बिगूल (COVID 19 vaccine)

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 3 मार्च: कोरोना विषाणूचं (COVID 19 vaccine) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण होणार आहे. तसंच 45 ते 60 वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचंही लसीकरण केलं जाणार आहे. दरम्यान प्रसिद्ध अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) हे देखील या मोहिमेत सहभागी झाले आहेत. त्यांनी कोरोनाची लस घेतली अन् इतरांना देखील ही लस घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. कमल हासन यांनी ट्विटच्या माध्यमातून लसीकरणाविषयी माहिती दिली. “श्री रामचंद्र या रुग्णालयात मी कोरोना विषाणूला रोखणारी लस घेतली. जे लोक स्वत:ची नाही पण इतरांची पर्वा करतात त्यांनी ही लस घेणं गरेजेचं आहे. सर्वांनी कोरोनापासून स्वत:च्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी COVID 19 ची ही लस घ्यावी. आता करोनाला रोखणारी लस घेऊया अन् पुढच्या महिन्यात भ्रष्टाचार रोखणारी लस देऊया” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं. सोबतच त्यांनी लस घेतानाचा एक फोटो देखील शेअर केला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी कोरोनासशीबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित बातम्या

अवश्य पाहा - देशभरात लसीकरण सुरू, भाजप खासदाराचे कोरोनामुळे निधन लसीकरणाचा तिसरा टप्पा पालिकेच्या व शासकीय रुग्णालयांसह खासगी इस्पितळांमध्येही लशीकरणास सुरुवात झाली आहे. शासकीय रुग्णालयात लसीकरण मोफत असून खासगी रुग्णालयांत लशीकरणासाठी कमाल अडीचशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. ओळखपत्र बंधनकारक सहआजार असलेल्या नागरिकांनी नोंदणीकृत वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यावसायिकांकडून प्रमाणित केलेले प्रमाणपत्र लसीकरण केंद्रात दाखविणे आवश्यक आहे. तर 60 वर्षांवरील नागरिकांनी वयाबाबतचा योग्य पुरावा (कार्यालयीन, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र इ.) सादर करणं आवश्यक आहे. ‘कोव्हिड डिजिटल प्लॅटफॉर्म’ हा 1 मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून खुला करण्यात आला आहे. मात्र पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया सुरळीत होईपर्यत नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असेही आवाहन पालिकेनं केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या