मराठी बातम्या /बातम्या /देश /देशभरात लसीकरण सुरू, भाजप खासदाराचे कोरोनामुळे निधन

देशभरात लसीकरण सुरू, भाजप खासदाराचे कोरोनामुळे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नंदकुमार सिंह चौहान यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नंदकुमार सिंह चौहान यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नंदकुमार सिंह चौहान यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

खंडवा, 02 मार्च : देशभरात एकीकडे कोरोना लसीकरण (corona vaccine) सुरू आहे तर दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेच वातावरण आहे. मध्य प्रदेशमधील खंडवाचे भाजपचे खासदार नंदकुमार सिंह चौहान (Nandkumar Singh Chouhan) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नंदकुमार सिंह चौहान यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. नंदकुमार सिंह चौहान हे खंडवा मतदारसंघाचे भाजपचे खासदार होते.

नंदकुमार सिंह चौहान यांनी सहावेळा खासदार म्हणून लोकसभेत निवडून आले होते. तर दोन वेळा त्यांनी आमदारकीही भुषवली आहे. तसंच चौहान सरकारमध्ये ते मंत्री सुद्धा राहिले होते. त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सुद्धा भुषवले होते. नंदकुमार सिंह चौहान यांच्या निधनामुळे भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Kanpur News : कानपूरमध्ये मोठा अपघात, ट्रक उलटून 22 मजूर अडकले, 6 ठार

दरम्यान, 1 मार्चपासून सर्वांसाठी कोरोना लस उपलब्ध झाली आहे.  60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस दिली जाते आहे. 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्यांना इतर आजार आहेत, त्यांनाही कोरोना लस दिली जाणार आहे. सर्वसामान्यांनी ही लस घ्यावी यासाठी बड्या नेत्यांनीच पुढाकार घेतला आहे आणि सर्वात आधी स्वतः ही लस घेतली आहे.

सकाळी बेडवरून उठावंसं वाटत नाही? या आहेत आळस घालवण्याच्या सोप्या ट्रिक्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील स्वतः कोरोना लस घेत नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहीत केलं आहे आणि त्यांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन लस टोचून घेतली आहे.  एम्स हॉस्पिटलमधील काम करणाऱ्या आणि पुद्दचेरी येथील राहणाऱ्या परिचारिका पी निवेदा यांनी पंतप्रधान मोदी यांना कोरोनाची लस दिली आहे.

First published:

Tags: BJP, Corona, Madhya pradesh