JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मोदींच्या व्हिडीओवर डिसलाईकचा पर्याय का नसतो? अभिनेत्याचा केंद्राला सवाल

मोदींच्या व्हिडीओवर डिसलाईकचा पर्याय का नसतो? अभिनेत्याचा केंद्राला सवाल

कमाल आर. खाननं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. तुमच्या व्हिडीओवर डिसलाईक करण्याचा पर्याय का नसतो? असा सवाल त्याने मोदींना केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 28 फेब्रुवारी : अभिनेता कमाल आर. खान उर्फ केआरके (Kamaal R Khan) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. तुमच्या व्हिडीओवर डिसलाईक करण्याचा पर्याय का नसतो? असा सवाल त्याने मोदींना केला आहे. “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (Narendra Modi) तुम्ही तुमच्या व्हिडीओवर लाईक डिसलाईक करण्याचा पर्याय देत नाही. मग इव्हीम मशीनचं बटण तरी दाबण्याचा पर्याय कसा द्याल? अरे मी विसरलोच तुम्हाला तर ईव्हीएमवर पुर्ण विश्वास आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन त्याने मोदींना उपरोधिक टोला लगावला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा - ‘कतरिनामुळं माझं करिअर खराब झालं’; झरीननं केला खळबळजनक आरोप

यापूर्वी त्यानं मोदींच्या फॉलोअर्सची देखील खिल्ली उडवली होती. “अन्न मिळालं नाही तरी चालेल, नोकरी मिळाली नाही तरी चालेल, पाकिटात पैसे नसले तरी चालेल, देशावरील कर्ज वाढलं तरी चालेल. भुकेलेले राहू, जंगलात राहू, नग्न राहू, मग भारताला अखंड ठेवू. देशातील सर्व कंपन्या विकल्या गेल्या तरी चालतील पण देश विकू देणार नाही. मला भक्तांची इच्छाशक्ती प्रचंड आवडते.” अशा आशयाचं ट्विट त्यानं केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या