JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Jaya Bacchan यांच्या या कृतीमुळं रेखा आणि बिग बींचं नातं तुटलं

Jaya Bacchan यांच्या या कृतीमुळं रेखा आणि बिग बींचं नातं तुटलं

जयाजींच्या त्या कृतीमुळं रेखा आणि बिग बी कधीही एकत्र येऊ शकले नाही. (Jaya Bachchan Amitabh Bachchan and Rekha Love triangle) पाहूया जया बच्चन यांनी असं केलं तरी काय होतं?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 9 एप्रिल: बॉलिवूडच्या चमचमत्या दुनियेत अनैतिक संबंध असणं ही बाब अगदी सामान्य समजली जाते. अनेक कलाकार एकत्र काम करतात. त्यांच्यात मैत्री होते अन् पुढे ते प्रेमात पडतात. काही सेलिब्रिटी तर विवाहीत असतानाही दुसऱ्या कलाकारासोबत लिव्हईन रिलेशनशिपमध्ये राहतात. या प्रकारासाठी आपण अनेकदा पाश्चात्य संस्कृतीला जबाबदार धरतो पण खरं सांगायचं झालं तर गेली अनेक दशकं बॉलिवूडमध्ये हे सर्रास घडत आहे. अगदी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांचंच उदाहरण घ्या ना. विवाहित असतानाही बिग बी सदाबहार रेखा यांच्या प्रेमात पडले होते. असं म्हटलं जातं की बिग बी जया बच्चन (Jaya Bachchan) यांना घटस्फोटही देणार होते. परंतु जयाजींच्या त्या कृतीमुळं रेखा आणि बिग बी कधीही एकत्र येऊ शकले नाही. (Jaya Bachchan Amitabh Bachchan and Rekha Love triangle) पाहूया जया बच्चन यांनी असं केलं तरी काय होतं? रेखा आणि अमिताभ यांनी 1976 साली दो अंजाने या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. याच दरम्यान दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. पुढे त्यांनी सिललिसा, मिस्टर नटवरलाल, मुकद्दर का सिकंदर, खून पसिना यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. विशेष म्हणजे प्रत्येक चित्रटानंतर रेखा आणि बिग बींच्या अफेअरचा चर्चा वाढू लागल्या. अनेकदा याबाबत जया बच्चन यांनी बिग बींकडे तक्रार केली. त्यांना रेखासोबत काम करण्यास रोखण्याचाही प्रयत्न केला. पण त्यानंतरही बिग बी आणि रेखा एकत्र काम करत होते. असं म्हटलं जातं की बिग बी जया बच्चन यांना घटस्फोट देण्याचा विचार करतो होते. या बातम्या त्यावेळी वृत्तमाध्यमांमध्येही झळकत होत्या. अवश्य पाहा - वडिलांच्या ‘या’ अटीमुळं मोडणार होतं Big B आणि Jaya Bacchan यांचं लग्न त्यामुळं आपला संसार टीकवण्यासाठी अखेर जया बच्चन यांनी रेखासोबत थेट बोलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रेखाला एके दिवशी जेवणासाठी घरी बोलावलं. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यामध्ये जयाजींनी रेखा यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की काहीही झालं तरी मी बिग बींना सोडणार नाही. तू माझ्या पतीपासून दूर राहा. त्यामुळं अखेर रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं नातं तुटलं. त्या रात्री रेखाला अनेकांनी बिग बींच्या घरातून रडत बाहेर जातानाही पाहिलं होतं असं म्हटलं जातं. त्यानंतर त्यांनी कधीही एकाच चित्रपट एकत्र काम केलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या