मुंबई 9 एप्रिल**:** जया बच्चन (Jaya Bachchan) या बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. ‘सिलसिला’, ‘गुड्डी’, ‘जंजीर’, ‘चुपके चुपके’, ‘बावर्ची’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांद्वारे गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आज जया बच्चन (Amitabh Bachchan) यांचा वाढदिवस आहे. 73 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. जया बच्चन यांनी अभिनय आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात प्रचंड यश मिळवलं. परंतु त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती अमिताभ बच्चन यांच्यामुळं. बिग बींसोबत लग्न केल्यानंतर त्या खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आल्या. (Amitabh Bachchan and Jaya Bachchan love story) परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल दोघांच्या लग्नासाठी हरिवंशराय बच्चन यांनी एक अट ठेवली होती. पाहा काय होता तो किस्सा…. 1971 साली ‘गुड्डी’ या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ आणि जया बच्चन यांची भेट झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. अन् पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनाही लग्न करायचं होतं. परंतु बिग बींचे वडील हरिवंशराय बच्चन यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. अर्थात कारण त्यांनी कधी सांगितलं नाही. परंतु अखेर मुलाच्या प्रेमापोटी त्यांनी लग्नास होकार दिला. परंतु या लग्नासाठी त्यांनी एक अट ठेवली होती. अवश्य पाहा - मराठी अभिनेत्रीचा Ice Yoga; VIDEO पाहून ऐन गरमीत गार व्हाल
अवश्य पाहा - स्वतःला पंतप्रधान मोदींची मुलगी म्हणणाऱ्या अवनी मोदीचं काय आहे सत्य? 1973 साली बिग बींचा ‘जंजीर’ हा चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटाला मिळालेलं यश साजरं करण्यासाठी सर्व कलाकार लंडनला जाणार होते. अन् त्यावेळी बिग बी स्वत:सोबत जया बच्चन यांना देखील घेऊन जात होते. परंतु वडिलांनी त्यास नकार दिला. “तू आत्ताच्या आत्ता लग्न कर व तिला घेऊन जा” असा जणू हुकूमच त्यांनी सोडला. लग्न करायचं असेल तर आत्ता करा अन्यथा नंतर करु देणार नाही. अशी अट त्यांनी ठेवली होती. सुरुवातीला या अटीची पुर्तता करण्यासाठी जया बच्चन आणि त्यांचे कुटुंबीय तयार नव्हते. त्यामुळं लग्न मोडतंय की काय अशीही परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु बिग बींनी प्रकरण सांभाळलं अन् जयाजींना लग्नासाठी तयार केलं. त्यामुळं अगदी घाईगडबडीत मोजक्याच कुटुंबीयांच्या उपस्थितीत 3 जून 1973 साली बिग बी आणि जया यांचा विवाह झाला. आज त्यांच्या जोडीला बॉलिवूडमधील सर्वात आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं.