मुंबई, 3 मार्च: अभिनेता अली गोनी (Aly Goni) आणि जॅस्मिन भसीन (Jasmin Bhasin) यांच्या मैत्रीचं रुपांतर आता प्रेमामध्ये झालं आहे. बिग बॉसच्या (Bigg Boss 14) घरामध्ये या दोघांच्या जोडीला खूप चांगली पसंती मिळाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आता हे लव्ह बर्ड्स एकत्र टाइम स्पेंड करत आहेत. त्यांच्यामधील प्रेम वाढत चाललं आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अली गोनी सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. तो सोशल मीडियावर जॅस्मिन सोबतचे फोटो पोस्ट करत आहे. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. अली गोनी जॅस्मिन भसीनच्या घरी गेला होता. त्यानं इन्स्टाग्रामवर दोघांचं एकत्र काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. अलीनं सध्या इन्स्टाग्रामवर जॅस्मिनसोबतचा खूपच सुंदर रोमँटिंक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दोघांच्याही चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. अली गोनीनं इन्स्टाग्रामवर जॅस्मिनसोबतचा फोटो पोस्ट करत ‘हम ही हमारी दुनिया है’ असे कॅप्शन दिलं आहे म्हणजे आमचं जग आम्हीच आहोत.
अली गोनीच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. अली आणि जॅस्मिनच्या या रोमँटिक फोटोला 5 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर अलीच्या चाहत्यांनी या फोटोवर भरभरुन कमेंट्स करत दोघांचं कौतुक केलं आहे. अली गोनीनं नुकताच जॅस्मिन आणि आपल्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला. अलीचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी जॅस्मिननं अलीच्या कुटुंबियांसोबत खास प्लॅनिंग केली होती आणि त्याला सरप्राइज दिलं होतं. अवश्य वाचा - ‘तांडव’ला सर्वोच्च न्यायालयाचा फटका; अॅमेझॉन प्राईमला मागावी लागली माफी एका मुलाखतीमध्ये अली गोनीनं जॅस्मिन भसीनसोबतच्या आपल्या मैत्रीबद्दल सांगितलं की, ‘एक अशी व्यक्ती असते जी आपल्या आयुष्यात खूपच जवळ असते. त्या व्यक्तीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. मला वाटतं की माझ्यासाठी जॅस्मिन ती व्यक्ती आहे. ती माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग आहे. माझी खूप चांगली मैत्रीण आणि कुटुंबातील सदस्य आहे.’ दरम्यान, बिग बॉस १४ च्या घरामध्ये दोघांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांची एक्साइटमेंट लेव्हल खूप वाढली होती. बिग बॉसच्या या सीझनमध्ये अली गोनी टॉप 3 आपलं स्थान मिळवू शकला नाही. तर जॅस्मिन भसीन या शोच्या फिनालेपर्यंत पोहचू शकली नाही.