मुंबई 11 मार्च: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Janhvi Kapoor ) मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार टीका करण्यात आली. स्टार किड्सला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. त्यांच्या चित्रपटांवर डिसलाईकचा भडिमार झाला. ज्या कुठल्या चित्रपटांमध्ये कलाकारांची मुलं झळकली त्या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारलं. या पैकीच एक चित्रपट अभिनेत्री जान्हवी कपूरचा देखील होता. घराणेशाही विरोधात आलेल्या या लाटेत तिचा ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ (Gunjan Saxena: The Kargil Girl) हा चित्रपट वाहून गेला. या चित्रपटावर भाष्य करताना जान्हवी भावूक झाली. स्टार किड असणं हे वरदान आहे की शाप असा प्रश्न आता तिला पडला आहे. (nepotism tag in Bollywood) अवश्य पाहा - बिग बॉसमधील अभिनेत्री झाली पॉर्नस्टार; केली आगामी चित्रपटाची घोषणा इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत तिनं स्टारकिड्सला मिळणाऱ्या विशेष वागणूकीवर आपलं मत मांडलं. ती म्हणाली, “लहान असल्यापासूनच माझ्या आजुबाजूच्यांनी मी कोणीतरी विशेष आहे याची जाणीव मला करून दिली आहे त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीत पाऊल टाकल्यानंतर नेपोटिझमचा मुद्दा पुढे आला असं नाहीए तो आधीपासूनच माझ्यासोबत आहे. शाळेतही मला चांगले गुण मिळाले काय किंवा शिक्षकांनी कौतुक केलं काय वर्गातलं कोणीतरी कुजबुजायचं अगं तुझे पालक प्रसिद्ध आहेत ना म्हणून शिक्षक असं बोलतायत. त्यामुळे या सगळ्याला मी सरावले आहे. आता दुसऱ्या कुणी माझ्याबद्दल बोलण्याआधीच तो काय म्हणेल याचा मी अंदाज लावते. आता आयुष्यभर स्टारकिड असल्याची आठवण सोबत ठेवायला लागणार आहे. त्यामुळे मला स्वत:ला सिद्ध करून दाखवण्यासाठी इतरांपेक्षा अधिक काही करून दाखवावं लागेल हे मनात पक्कं आहे. नाहीतर समोरचा खरंच कौतुक करतोय का हे कळणारच नाही. घराणेशाहीमुळं माझ्या मनात द्विधा अवस्था झाली आहे.” अवश्य पाहा - अभिनेत्यानं उडवली शाहरुखची खिल्ली; प्रदर्शनापूर्वीच ‘पठाण’ची पटकथा केली लीक “लोक कुठून कुठून इंडस्ट्रीत येतात हे मी जाणते. कदाचित जेव्हा धडक आला तेव्हा मला तो चित्रपट मिळण्यासाठीचं कारण माझ्या कामातून लोकांच्या लक्षात आलं नसावं. काहींना ते आवडलं काहींना नाही. घोस्ट स्टोरीजनंतर लोकांना माझं काम आवडलं. गुंजन नंतर आणखी आवडलं आणि रूही नंतर मी आणखी एक पाऊल पुढे जाईन. पण असंच करावं लागतं सतत काम करावंच लागतं. आतापर्यंतच्या माझ्या बॉलिवूडमधील प्रवासाबद्दल मी आनंदी आहे आणि त्यातूनच मला अधिक श्रम करण्याची प्रेरणा मिळते.” असं मत जान्हवीनं या मुलाखतीत व्यक्त केलं.