मुंबई 11 मार्च: कमाल आर खान उर्फ केआरके (KRK) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींशी पंगा घेताना दिसतो. यावेळी त्यानं बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानवर (Shah Rukh Khan) निशाणा साधला आहे. त्यानं शाहरुखवर टीका करत त्याच्या आगामी पठाण या बिग बजेट चित्रपटाची पटकथा लिक केली आहे. त्याने केलेले हे ट्विट्स सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (Pathan story leaked by KRK)
शाहरुखचा ‘झिरो’ हा शेवटचा चित्रपट तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. शिवाय त्याच्या वाढत्या वयावर देखील काही प्रेक्षकांनी जोरदार टीका केली होती. आता तो पठाण या चित्रपटातून जोरजार पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. मात्र त्याचं हे स्वप्न केआरकेने मात्र धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानं चक्क पठाण चित्रपटातील काही महत्वाचे ट्विस्ट लीक केले आहेत.
अवश्य पाहा - ठाकरे की फडणवीस? अरविंद जगताप यांचा ब्लॉग वाचून मराठी माणसाला बसेल धक्का
नेमकं काय म्हणाला केआके?
“शाहरुखनं गेल्या तीन-चार वर्षात एकाही चित्रपटात काम केलेलं नाही. या पार्श्वभूमीवर तो दमदार पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. पण त्यानं माझा भ्रमनिरास केला. पठाण चित्रपटात तो रॉसाठी काम करणाऱ्या एका गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे. शिवाय जॉन अब्राहम माफिया आणि दीपिका पदुकोण महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसेल. शाहरुखला वाटतंय हा चित्रपट सुपरहिट होईल.”
He is just doing this film coz director’s last film #War was hit without a story. But he must understand that ppl went to watch young super stars and brilliant dancers @iHrithik and @iTIGERSHROFF not the story. While ppl are not interested to watch #SRK’s film without story!
— KRK (@kamaalrkhan) March 5, 2021
“सिद्धार्थ आनंदचा वॉर सुपरहिट झाला म्हणून शाहरुख आता त्याला कॉपी करतोय. पण मित्रा त्या चित्रपटात हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ सारखे तरुण कलाकार होते. चित्रपटाला पटकथा नसतानाही केवळ त्यांचा डान्स आणि अॅक्शन सीन पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली. पटकथा नसलेला तुझा चित्रपट कोण पाहणार?” अशा आशयाची दोन ट्विट्स करुन केआरकेनं शाहरुख खानची खिल्ली उडवली आहे. शिवाय त्यानं या ट्विटच्या माध्यमातून चित्रपटातील महत्वाची माहिती देखील लीक करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान त्याच्या या ट्विटवर अद्याप शाहरुख किंवा पठाण चित्रपटातील कुठल्याही कलाकारानं अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.