JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / .... म्हणून इरफानने खानने स्वत:चं आडनाव लावणंही बंद केलं होतं

.... म्हणून इरफानने खानने स्वत:चं आडनाव लावणंही बंद केलं होतं

दिवंगत अभिनेता इरफान खानचा (Irrfan Khan) जन्म 7 जानेवारी 1967 रोजी राजस्थानच्या एका रॉयल फॅमिलीमध्ये झाला होता. प्रत्येक भूमिका तो जीव ओतून साकारत असे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 जानेवारी : बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता इरफान खान (Irrfan Khan)  याची आज जयंती आहे. आपल्या उत्तम अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याने 29 एप्रिल 2020 रोजी जगाचा निरोप घेतला होता. दुर्धर आजाराने वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. इरफान खान याने आपल्या कारकिर्दीत गंभीर, कॉमेडी आणि विविध प्रकारच्या भूमिका केल्या. प्रत्येक भूमिकेत त्याने जीव ओतून काम केलं. त्याच्या डोळ्यातून देखील त्याचा अभिनय दिसून येत असे. इरफान खानचं खरं नाव हे साहबजादे इरफान अली खान (Sahabzade Irfan Ali Khan) असं होतं. राजस्थानमधील टोंकमध्ये 7 जानेवारी 1967 ला त्यांचा जन्म झाला होता. त्यांचं कुटुंब म्हणजे ‘रॉयल फॅमिली’ होती. परंतु बॉलिवूडमध्ये आल्यानंतर इरफानने आपलं नाव छोटं करत इरफान असं केलं होतं. याविषयी त्यांनी एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं होतं. याविषयी बोलताना त्यांनी ‘मी इरफान आहे, फक्त इरफान. मी काही काळापूर्वी माझ्या नावातून  ‘खान’ काढून टाकला आहे. वास्तविक,  मी माझा धर्म, माझे आडनाव किंवा अशा कोणत्याही गोष्टीमुळे ओळखला जाऊ इच्छित नाही. माझ्या पूर्वजांच्या कार्यामुळे लोकांनी मला ओळखावं असं मला वाटत नाही. त्यामुळे मी आडनाव खान काढून टाकल्याचे त्यांनी स्पष्ट केलं होतं. याचबरोबर त्यांनी आपल्या नावात इरफानमध्ये (Irrfan Khan)  दोन R चा समावेश केला होता. त्यांना याचा उच्चार आवडत असल्याने त्यांनी आपल्या नावात दोन आर टाकले होते. यामागे कोणतंही दुसरं कारण नव्हतं. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील दोन R असणारे इरफान हे नाव वापरले होते. दरम्यान, इरफान खान यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात टीव्ही मालिकांमधून केली. चंद्रकांता ही त्यांची सुरुवातीची टीव्ही मालिका होती. त्याचबरोबर चाणक्य या मालिकेत देखील त्यांनी काम केले. त्यानंतर 1988 मध्ये त्यांनी ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटात भूमिका केली होती. पण नंतर त्यांची भूमिका कट करण्यात आली. इरफान खानने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यांचे ‘ये साली जिंदगी’, ‘पीकू’, ‘पान सिंह तोमर’, ‘हिंदी मीडियम’ हे गाजलेले चित्रपट आहेत. सलाम बॉम्बे या चित्रपटात त्याची भूमिका कापल्यानंतर इरफानला ‘रोग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानंतर इरफानने कधीही मागे वळून न पाहता शेकडो हिट चित्रपट दिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या