मुंबई, 21 एप्रिल : बॉलिवूडचा (bollywood actor) अभिनेता इरफान खानच्या (irrfan khan) निधनाला एक वर्ष होतं आलं. अजूनही बॉलिवूड इरफानच्या आठवणीत वावरत आहे. मात्र आनंदाची गोष्ट म्हणजे लवकरच इरफान खानचा मुलगा (irrfan khan son) बाबिल खानने (babil khan) बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. बाबिल लवकरच ‘काला’ (Qala) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. बिग बी अमिताभ बच्चन (amitabh bacchan) यांनीही बाबिलच्या चित्रपटाचा टीझर आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. यावर बाबिल अगदी भारावून गेला होता. त्याने बच्चन यांची पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर करून आनंद व्यक्त केला होता. तसंच आता वडील इरफान आणि अमिताभ यांना एकत्रित फोटो शेअर करत त्याने एक इच्छाही व्यक्त केली आहे. बाबिलने अमिताभ बच्चन आणि वडील इरफान खानचा थ्रोबक फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 2015 मधील ‘पिकू’ या चित्रपटाच्या सेटवरचा हा फोटो आहे. फोटोमध्ये अमिताभ बच्चन आणि इरफान खान एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत आहे.
बाबिलने या फोटोसह अगदी भावुक अशी पोस्टही केली आहे. बाबिल म्हणाला, “मी लगेच चिंताग्रस्त होतो आणि माझा राग व्यक्त करतो. पणविचार करतो की माझ्या बाबांचे चाहते दयाळू आणि सळसळत्या रक्ताचे आहेत. त्यामुळे तिरस्काराकडे कानाडोळा करू या. मी आत्मविश्वासाने आणि धाडसाने त्या लायकीचा बनून दाखवेन की माझा बाबांच्या चाहत्यांना देखील माझ्यावर अभिमान वाटेल”
आपल्या बाबांना आणि अमिताभ यांना एकत्रित पाहून बाबिलने आपली एक इच्छाही व्यक्त केली आहे. आपल्याला एकदा अमिताभ यांच्यासोबत काम करायचं आहे, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे. हे वाचा - अभिनेत्री हिना खानवर कोसळला दु:खाचा डोंगर; अगदी जवळच्या व्यक्तीचं निधन ) ‘काला’ बद्दल सांगायचं झालं तर अन्विता दत्त यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात बाबिलसोबत सहअभिनेत्री तृप्ती डमरी असणार आहे. चित्रपटाचा टीझर पाहूनच सर्वांना उत्कंठा लागली आहे. टीझरवरून चित्रपटाचं शूटिंग बर्फाळ प्रदेशात झाल्याचं दिसून येतं. चित्रपट प्रदर्शनाची तारीख अजून जाहीर झालेली नाही. मात्र टीझर पाहूनच बाबिलचं सर्वांकडून कौतुक होतं आहे.