JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / या उत्तरामुळं लारा दत्ता होती ‘मिस युनिव्हर्स’; उत्तर ऐकून परीक्षकही पडले सुन्न

या उत्तरामुळं लारा दत्ता होती ‘मिस युनिव्हर्स’; उत्तर ऐकून परीक्षकही पडले सुन्न

लारा दत्तानं केला होता सौंदर्य स्पर्धेचा विरोध; या अजब उत्तरामुळं झाली ‘मिस युनिव्हर्स’

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 16 एप्रिल**:** लारा दत्ता (Lara Dutta) ही एकेकाळी बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. तिनं आपल्या सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आज लाराचा वाढदिवस आहे. 43व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लारानं मिस युनिव्हर्स (Miss Universe 2000) ही सौदर्य स्पर्धा जिंकून प्रसिद्धी मिळवली होती. पण तुम्हाचा वाचून आश्चर्य वाटेल तिनं त्याच स्पर्धेत सौंदर्य स्पर्धांचा विरोधही केला होता. त्यावेळी तिनं दिलेलं उत्तर ऐकून टाळ्यांचा अक्षरश: कडकडाट झाला होता. पाहूया काय होता तो प्रसंग… लारानं 12 मे 2000 साली मिस युनिव्हर्स या किताबावर आपलं नाव कोरलं होतं. खरं तर या स्पर्धेत जगभरातील अनेक सौंदर्यवतींनी भाग घेतला होता. पण लाराच्या एका उत्तरानं सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. तिनं या स्पर्धेत भाग का घेतला? असा प्रश्न तिला अंतिम फेरीत विचारला गेला होता. यावर तिनं सर्वांनाच चकित करणार उत्तर दिलं. ती म्हणाली होती, “मला स्वत:ला सिद्ध करायचं आहे. माझ्यासाठी ही केवळ सौंदर्य स्पर्धा नाही तर आवडत्या क्षेत्रात जाण्यासाठी मदत करणारा एक मंच आहे. आपण सर्वच जण या स्पर्धेत भाग घेणाऱ्या तरुणींच्या सौंदर्याच्या मोहात पडतो पण सोबतच त्यांच्या इतर गुणांकडे मात्र दुर्लक्ष करतो. मुळात सौंदर्य स्पर्धा हे नावच मला चुकिचं वाटतं. त्या ऐवजी कर्तुत्ववान स्त्रियांची स्पर्धा असं आपण म्हणायला हवं.” याच उत्तरामुळं लाराला अंतिम फेरीत विजयी घोषित करण्यात आलं असं म्हटलं जातं. अवश्य पाहा - चार्ली चॅप्लिन यांचे अजरामर चित्रपट; या लिंकवर क्लिक करुन पाहा अगदी मोफत

मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर तिनं आपलं लक्ष बॉलिवूडच्या दिशेनं वळवलं. 2003 साली ‘अंदाज’ या चित्रपटातून तिनं सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. शिवाय या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. पुढे ‘मुंबई से आया मेरा दोस्त’, ‘मस्ती’, ‘ऐलान’, ‘जुर्म’, ‘काल’, ‘नो एण्ट्री’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिनं काम केलं. येत्या काळात ती ‘बेल बॉटम’ या चित्रपटात झळकणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या