चार्ली चॅप्लिन यांचे अजरामर चित्रपट; या लिंकवर क्लिक करुन पाहा अगदी मोफत

चार्ली चॅप्लिन यांचे अजरामर चित्रपट; या लिंकवर क्लिक करुन पाहा अगदी मोफत

चेहऱ्यावरील हावभावांच्या मदतीनं प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या महान विनोदवीराची आज 132 वी जयंती आहे.

  • Share this:

मुंबई 16 एप्रिल: चार्ली चॅप्लिन (Charlie Chaplin) हे मनोरंजनसृष्टीच्या इतिहासातील अजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय विनोदवीरांपैकी एक म्हणून ओळखले जातात. केवळ हातवारे आणि चेहऱ्यावरील हावभावांच्या मदतीनं प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या महान विनोदवीराची आज 132 वी जयंती आहे. द गोल्ड रश, द सर्कस, मॉर्डन टाईम्स, द ग्रेट डिक्टेटर यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. यापैकी काही चित्रपट तुम्ही अगदी मोफत पाहू शकता.

द गोल्ड रश – हा चित्रपट 1925 साली प्रदर्शित झाला होता. सोन्याच्या शोधात निघालेल्या लोकांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

अवश्य पाहा - चार्ली चॅप्लिन यांचा मृतदेह गेला होता चोरीला; कारण...

द सर्कस – हा चित्रपट 1928 साली प्रदर्शित झाला होता. सर्कसमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपटाचे कथानक आहे.

द मॉर्डन टाईम्स – हा चित्रपट 1936 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पहिल्या औद्योगिक क्रांतीचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

द ग्रेट डिक्टेटर – हा चित्रपट 1940 साली प्रदर्शित झाला होता. जर्मनीचा हुकूमशाह अॅडोल्फ हिटलरवर टीका करण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती चार्ली चॅप्लिन यांनी केली होती.

द किड – हा चित्रपट 1921 साली प्रदर्शित झाला होता. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

चार्ली चॅप्लिन हे कम्यूनिस्ट विचारांचे होते असं म्हटलं जातं. त्यामुळे 70च्या दशकात त्यांच्या चित्रपटांवर अमेरिकेने बंदी घातली होती.

Published by: Mandar Gurav
First published: April 16, 2021, 9:34 AM IST
Tags:

ताज्या बातम्या