मुंबई 15 मार्च**:** कोरोना विषाणूचं (COVID 19) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळं वैद्यकिय तज्ज्ञ आणि सरकार वारंवार कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यास सांगत आहे. परंतु असं असताना देखील बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) हिनं कोरोनाचे नियम मोडले परिणामी तिच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेनं (BMC) तक्रार दाखल केली आहे. गौहरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. असं असताना देखील तिनं कोरोनाचे नियम मोडले. परिणामी इतरांच्या सुरक्षितेसाठी महानगरपालिकेनं तिच्याविरोधात अधिकृत तक्रार नोंदवली आहे. याबाबत त्यांनी एका ट्विटद्वारे माहिती दिली. “शहराच्या सुरक्षितेसाठी आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही. एका बॉलिवूड अभिनेत्रीनं कोरोनाच्या निर्देशांचं पालन केलं नाही. त्यामुळं आम्ही तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तुम्ही सेलिब्रिटी असाल किंवा सर्वसामान्य नागरिक नियम हे सर्वांसाठी समान असतात. त्यामुळं विषाणूचा नाईनाट करण्यासाठी कृपया प्रशासनाला सहकार्य करा.” अशा आशयाचं ट्विट BMC नं केलं आहे. सध्या पोलीस गौहरच्या रिपोर्टमध्ये काही छेडछाड करण्यात आली आहे का? याचा तापस करत आहेत. दरम्यान अभिनेत्री ओशिवरा भागात फिरत आहे असं BMCच्या लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी तिच्याकडून कोरोना नियमांचं पालनं होतंय का याची देखील तपासणी केली. या तपासाचा निष्कर्ष तिनं नियम मोडले असा काढण्यात आला. परिणामी BMCनं तिच्याविरोधात तक्रार दाखल केली.
अवश्य पाहा - बॉलिवूड कोरोनाच्या विळख्यात; अभिनेते आशीष विद्यार्थी यांना Covid 19 ची लागण महाराष्ट्रातील कोरोनास्थिती चिंताजनक महाराष्ट्रात कोरोनाच्या वेगाने होणाऱ्या दैनंदिन रुग्णवाढीबाबत गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. राज्यातील परिस्थिती गंभीर बनू लागली असून तातडीने नमुना चाचण्या वाढवण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट टळलेले नसून कोणताही निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो, हे महाराष्ट्रातील स्थितीवरून स्पष्ट होते. त्यामुळे अन्य राज्यांनीही दक्ष राहावे, असा इशारा निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी दिला.