मुंबई 13 मार्च: कोरोना विषाणूचं (COVID 19) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आशीष विद्यार्थी (Actor Ashish Vidyarthi) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. (COVID19 positive) सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने दिल्लीतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
आशीष विद्यार्थी यांच्यावर दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एका इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. “नमस्कार मित्र मंडळींनो, काल मला थोडसं अशक्त झाल्यासारखं वाटतं होतं. त्यामुळं मी कोरोना चाचणी करुन घेतली. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या दिल्लीतील रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरु आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना विनंती आहे की त्यांनी देखील स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. माझी प्रकृती स्थिर आहे. काळजी करु नये.” अशा आशयाचा संदेश त्यांनी या व्हिडीओद्वारे दिला. यापूर्वी रणबीर कपूर, संजय लीला भंसाळी आणि मनोज वाजपेयी यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
अवश्य पाहा - ना दीपिका ना अनुष्का... या अभिनेत्रीनं मारली बाजी; आदिपुरुषमध्ये साकारणार सीता
View this post on Instagram
महाराष्ट्रातील कोरोनास्थिती चिंताजनक
महाराष्ट्रात कोरोनाच्या वेगाने होणाऱ्या दैनंदिन रुग्णवाढीबाबत गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. राज्यातील परिस्थिती गंभीर बनू लागली असून तातडीने नमुना चाचण्या वाढवण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट टळलेले नसून कोणताही निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो, हे महाराष्ट्रातील स्थितीवरून स्पष्ट होते. त्यामुळे अन्य राज्यांनीही दक्ष राहावे, असा इशारा निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actor, Bollywood, Corona vaccination, Coronavirus, Covid-19 positive, Covid19