JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / राम गोपाल वर्मांनी केलं कंगना रणौतचं कौतुक, अभिनेत्रीची प्रतिक्रिया VIRAL

राम गोपाल वर्मांनी केलं कंगना रणौतचं कौतुक, अभिनेत्रीची प्रतिक्रिया VIRAL

प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Director Ram Gopal Varma)आणि कंगनाचं विविध राजकीय मुद्द्यांवरून अनेकदा खटकलं आहे. असं असताना राम गोपाल वर्मा यांनी कंगनाचा आगामी चित्रपट ‘थलाइवी’चा ट्रेलर (Thalaivi Trailer) पाहून कंगनावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

संबंधित बातम्या

यावर कंगनानेही दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या खिलाडू वृत्तीचं कौतुक केलं आहे. तिने संबंधित ट्वीटला क्वोट करताना लिहिलं की, ‘हॅलो सर! मी तुमच्याशी सहमत आहे. तुम्ही मला खूप आवडता आणि मी नेहमीच तुमची प्रशंसा करते. अहंकारांनी भरलेल्या या जगात जिथं लोकं इगो आणि गर्वासाठी लगेच दुखावले जातात. असं असताना तुम्ही काही गांभीर्यानं घेत नाहीत, अगदी स्वत:लाही. मी तुमच्या या गुणाचं कौतुक करते. चित्रपटासाठी माझं कौतुक केल्याबद्दल धन्यवाद!’ हे ही वाचा - ‘कंगना जयललितांच्या भूमिकेत, मस्करी करताय का?’; राम गोपाल वर्मांचा टोला कंगनाने दिलेली ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियात चांगलीच व्हायरल होतं आहे. कंगनाचा थलाइवी हा चित्रपट तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनवर अधारित आहे. या चित्रपटात जयललिता यांचा ‘एक प्रसिद्ध अभिनेत्रीपासून ते एका यशस्वी राजकारणीपर्यंतचा प्रवास दाखवला आहे. हा चित्रपट 23 मार्च रोजी देशातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या