JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आजपासून पूर्ण क्षमतेने थिएटर सुरू; मात्र 'या' नियमांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महाग

आजपासून पूर्ण क्षमतेने थिएटर सुरू; मात्र 'या' नियमांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महाग

गेल्या अनेक महिन्यांनंतर पूर्ण क्षमतेनं थिएटर सुरू होत आहे. ही आनंदाची बाब असली तरी हलगर्जीपणा नको.

जाहिरात

Cinema Hall

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली,1 फेब्रुवारी :  कोरोना संसर्गामुळे (Corona) बंद ठेवण्यात आलेली सिनेमागृहे (Cinema Hall) 1 फेब्रुवारी म्हणजेच आजपासून सुरु करण्यात येत आहेत. कोविड -19 च्या अनुषंगाने खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या अटीवर प्रेक्षकांसाठी 100 टक्के क्षमतेने सिनेमागृहे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर (Central Minister Prakash Javadekar)  यांनी रविवारी दिली. यावेळी त्यांनी सिनेमागृहांसाठी स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (Standard Operating Procedure) देखील जाहीर केली. श्री. जावडेकर म्हणाले, की फेब्रुवारीपासून प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन चित्रपटांचा आनंद घेऊ शकणार आहेत, ही चांगली बाब आहे. आम्ही सिनेमागृहे पुर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. आता सिनेमागृहे 100 टक्के क्षमतेने सुरु होई शकतात. परंतु, आम्ही त्यांना जास्तीत जास्त आॅनलाईन बुकींगसाठी (Online Booking) प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सिनेमागृहांसाठी एसओपी जाहिर करताना ते म्हणाले, की सध्या असलेले सॅनिटेशन आणि कोविड-19 चे नियम पहिल्याप्रमाणेच लागू असतील. परंतु लोकांना सिनेमागृहामधील खाद्य पदार्थ खरेदी करण्यास आता मुभा देण्यात आली आहे. कन्टेंनमेंट झोनमधील (Contentment Zone) सिनेमागृह सुरु करण्यास बंदी कायम असेल. एसओपीनुसार 100 टक्के आसनक्षमता सुरु करण्याची परवानगी केवळ सिनेमागृहांनाच असेल. यासोबतच सरकारने सिनेमागृहे डिजीटल करण्यावर भर दिला आहे. याअंतर्गत प्रेक्षकांनी तिकीट आणि खाद्य पदार्थ खरेदीसाठी जास्तीत जास्त ऑनलाईन पेमेंटचा पर्याय वापरावा. तसेच तिकीट बुकींग वेळी प्रेक्षकांची गर्दी होऊ नये यासाठी आगाऊ बुकिंगसाठीच्या काऊंटर व्यवस्थेचा अधिक विस्तार करावा, अशा सुचना सिनेमागृहांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

हे देखील वाचा - Farmers Protest : शेतकरी आंदोलनात सहभागी झाला नाहीत तर… पंजाबच्या ग्रामपंचायतीचा आदेश या व्यतरिक्त एसओपीमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी पुरेशी खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सिनेमागृहात मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे (Social Distancing) पालन करणे, श्वसनासाठी योग्य सुविधा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सिनेमागृहात प्रवेश करतेवेळी थर्मल टेस्टींग (Tharmal Testing) करणे आवश्यक आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी चित्रपट संपल्यानंतर एका रांगेत बाहेर पडावे, तसेच चित्रपट एकापेक्षा अधिक स्क्रिनवर दाखवले जावेत, असे एसओपीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या