JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / हार्ट सर्जरीनंतर रेमो डिसूझाने पहिल्यांदाच केला डान्स; डॉक्टरांनाही नाचवलं, पाहा VIDEO

हार्ट सर्जरीनंतर रेमो डिसूझाने पहिल्यांदाच केला डान्स; डॉक्टरांनाही नाचवलं, पाहा VIDEO

हृदयाची शस्त्रक्रिया (heart surgery) झाल्यानंतर रेमोने (remo d’souza) पहिल्यांदाच डान्स केला आहे. रेमो ‘स्ट्रीट डान्सर 3D’ या चित्रपटातील ‘मुकाबला’ या गाण्यावर जोरदार डान्स (Dance) करताना दिसत आहे. पाहा VIDEO

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जानेवारी: प्रसिद्ध कोरियोग्राफर रेमो डिसूझाने (remo dsouza) रूग्णालयात डॉक्टरांच्या एका टीमसोबत डान्स (dance with Doctors team) केला आहे, याचा संबंधित व्हिडिओ त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हृदयाची शस्त्रक्रिया (heart surgery) झाल्यानंतर रेमोने पहिल्यांदाच डान्स केला आहे. या व्हिडिओमध्ये रेमो ‘स्ट्रीट डान्सर 3D’या चित्रपटातील ‘मुकाबला’ या गाण्यावर जोरदार डान्स करताना दिसत आहे. यावेळी या व्हिडिओच्या माध्यमातून रेमोने डॉक्टरांच्या टीमचे आभार मानले आहेत. रेमोने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर, अवघ्या काही तासांतच लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना अनेक चाहत्यांनी रेमोचं अभिनंदन केल असून पुन्हा एकदा डान्स करताना पाहून आनंद झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. रेमो डिसूझाला काही दिवसांपूर्वी हृदयाचा झटका आला होता. त्यानंतर त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोकिलाबेन रुग्णालयात त्याच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून रेमोला डिस्चार्जही देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

रेमोची पत्नी लीझेल पूर्णवेळ त्याच्यासोबतच रूग्णालयात होती. यादरम्यान लीझेलने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये रेमो डिसूझा गाण्याच्या तालावर पाय थरथरताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना लीझलनं लिहिलं की, ‘पायांसोबत डान्स करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि हृदयापासून डान्स करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वादांसाठी सर्वांचं आभार. रेमोने आतापर्यंत अनेक ‘डान्स रिअॅलिटी शो’ जज म्हणून काम केलं आहे. तसेच त्याने आपल्या चित्रपटांमधूनही बॉलीवूडवर एक वेगळी  छाप पाडली आहे. त्याने त्याच्या करिअरची सुरुवात झी टीव्हीवरील रिअॅलिटी शो ‘डान्स इंडिया डान्स’मधून केली होती. त्याचबरोबर त्याने कलर्सवरील रिअ‍ॅलिटी शो ‘झलक दिखला जा’ मध्येही जज म्हणून काम केलं आहे. विशेष म्हणजे रेमो डिसूझाने कधीही डान्सचं प्रशिक्षण घेतलं नाही. मायकेल जॅक्सनचे व्हिडिओ पाहून तो डान्स करायला शिकला आहे. लहानपणापासूनच तो मायकेलचे डान्स पाहून स्वतः ला कोरियोग्राफ करायचा. पण नंतरच्या काळात पैशांच्या चणचणीमुळे त्याने आपला डान्स क्लास सुरू केला आणि लोकांना डान्स शिकवायला सुरुवात केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या