मुंबई, 18 फेब्रुवारी : चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. या शोमधील कलाकारांचे विनोदी व्हिडीओज सतत सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दोन लहान मुलं एकमेकांशी भांडण करताना दिसत आहेत. या मुलांचं भांडण पाहून तुम्ही देखील हसून हसून वेडे व्हाल. झी मराठीनं नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. चला हवा येऊ द्यामध्ये झळकणारे अभिनेता अंकुर वाढवे (Ankur Wadhve) आणि महेश जाधव (Mahesh Jadhav) हे दोघे यात भांडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या दोन लहान मुलांच्या भांडणाच्या व्हिडिओवरून हा व्हिडिओ बनवला आहे. यात अंकुर महेशला धमक्या देतोय पण महेश मात्र ‘शंकरपाळ्या’ या शब्दाशिवाय काही बोलतच नाही. मूळ व्हिडिओही प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा ठरला होता, आता या व्हिडीओची मजा प्रेक्षक घेत आहेत.
अवश्य पाहा - VIDEO: कसला कोरोना आणि कसलं काय; आर्चीला पाहण्यासाठी चाहत्यांनी केली तुडुंब गर्दी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही प्रेक्षकांच्या मते मूळ व्हिडीओपेक्षा हा रिमेक व्हिडीओमुळं त्याचं अधिक मनोरंजन झालं. महेश जाधवनेही आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.