मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: कसला कोरोना आणि कसलं काय; आर्चीला पाहण्यासाठी चाहत्यांनी केली तुडुंब गर्दी

VIDEO: कसला कोरोना आणि कसलं काय; आर्चीला पाहण्यासाठी चाहत्यांनी केली तुडुंब गर्दी

आर्चीला पाहण्यासाठी कोरोनाच्या भीतीकडेही दुर्लक्ष करत चाहत्यांनी तुडुंब गर्दी केली. या गर्दीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

आर्चीला पाहण्यासाठी कोरोनाच्या भीतीकडेही दुर्लक्ष करत चाहत्यांनी तुडुंब गर्दी केली. या गर्दीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

आर्चीला पाहण्यासाठी कोरोनाच्या भीतीकडेही दुर्लक्ष करत चाहत्यांनी तुडुंब गर्दी केली. या गर्दीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

  मुंबई, 17 फेब्रुवारी: कोरोना विषाणूचं संक्रमण अद्याप नियंत्रणात आलेलं नाही. दररोज शेकडोंच्या संख्येनं नवे रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे वैद्यकिय तज्ज्ञ आणि सरकार वारंवार सोशल डिस्टंसिंग ठेवण्यास सांगत आहे. मात्र आर्चीला पाहण्यासाठी कोरोनाच्या भीतीकडेही दुर्लक्ष करत चाहत्यांनी तुडुंब गर्दी केली. या गर्दीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. नांदेड येथील सारखनी भागातील लेंगी महोत्सवाला अभिनेत्री रिंकू राजगुरु अर्थात सैराट फेम आर्चीला खास पाहुणी म्हणून बोलावण्यात आलं होतं. आर्चीच्या आगमनामुळं गावातील मंडळींमध्ये वेगळीच उर्जा संचारली. ग्रामस्थांनी कोरोनाची बंदनं झुगारत केवळ आर्चीची एक झलक पाहण्यासाठी एकच गर्दी केली. परिणामी आयोजकांनाही रिंकूच्या सुरक्षेसाठी अधिक धावपळ करावी लागली.
  अवश्य पाहा - फँड्रीमधील सिम्पल ‘शालू’चा ग्लॅमरस अवतार; BOLD PHOTO पाहून व्हाल सैराट रिंकू राजगुरूच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ती अलिकडेच 'हण्ड्रेड' या वेब सीरिजमध्ये आणि 'अनपॉज्ड' या चित्रपटात झळकली होती. 'अनपॉज्ड' या चित्रपटासाठी पाच नामांकित कलाकार एकत्र आले होते. राज अँड डीके, निखील अडवाणी, तनिष्ठा चटर्जी, अविनाश अरूण आणि नित्या महरातो यांनी एकत्रितपणे या चित्रपटाची निर्मिती केली होती. राज्यात कोरोनाचा प्रसार वाढला, नव्या लाटेची शंका राज्यात कोरोनाचा  (Corona Virus) कहर कायम आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रुग्णांच्या संख्येत घट आल्यानंतर आता 42 व्या दिवशी पुन्हा एकदा महाराष्ट्र (Corona Cases In  Maharashtra) देशातील सर्वाधित प्रभावित राज्य ठरलं आहे. 3 हजार 365 नव्या कोरोना (Covid-19) रुग्णसंख्येसह राज्यानं केरळला मागे सोडलं आहे. केरळमध्ये सोमवारी 2 हदार 884 कोरोना रूग्ण आढळले होते. राज्यात नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच कोरोनाचे इतके जास्त रूग्ण आढळले आहेत. सोमवारी देशात 9 हजार 93 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मागच्या दोन सोमवारची यासोबत तुलना केल्यास संख्येत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी रूग्णसंख्या कमी येण्याचं कारण म्हणजे वीकेंडमुळं स्टाफ कमी असल्यानं चाचण्याही कमी झाल्या होत्या. सोमवारी 4.9 लाखापेक्षाही कमी चाचण्या झाल्या. 6 महिन्यात इतक्या कमी चाचण्या होण्याची ही पहिलीच वेळ होती. सोमवारी देशात 82 रुग्णांचा मृत्यू झाला. यानंतर आतापर्यंत मृतांचा आकडा 1 लाख 55 हजार 844 च्या पार गेला आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Rinku rajguru, Sairat

  पुढील बातम्या