JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉबी देओल ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; या महिलेला दिलं पुरस्काराचं श्रेय

बॉबी देओल ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; या महिलेला दिलं पुरस्काराचं श्रेय

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड हा एक प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. सिनेसृष्टीतील उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बॉबी देओल हा बॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. नुकतंच त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ‘आश्रम’ या वेब सीरिजमधील निराली बाबा या व्यक्तिरेखेसाठी त्याला दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड मिळाला आहे. सोशल मीडियावर आईसोबतचा एक फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी त्यानं आपल्या चाहत्यांना दिली. या पुरस्काराचं श्रेय त्यानं आपल्या आईला दिलं आहे. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड हा एक प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. सिनेसृष्टीतील उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. त्यामुळे बॉबीचे चाहते प्रचंड खुश आहेत. त्यानं आपल्या आईसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना ही खुशखबर दिली. “हा क्षण मी माझ्या आईसोबत साजरा करत आहे.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून त्यानं आपला आनंद व्यक्त केला. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

संबंधित बातम्या

अवश्य पाहा -  अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि पती रोहितनं बाळाचं केलं मजेशीर स्वागत, पाहा VIDEO ‘आश्रम’ ही सध्याची सर्वात चर्चेत असलेली वेब सीरिज आहे. या सीरिजच्या माध्यमातून बॉबीनं वेब प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. ही सीरिज धर्माच्या नावाखाली लोकांना गंडवणाऱ्या ‘निराली बाबा’ नामक एका ढोंगी बाबाच्या आयुष्यावर आधारित आहे. हे पात्र बॉबी देओलने साकारलं होतं. यामध्ये त्याने केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली. समिक्षकांनीही त्याच्या अभिनयाची दाद दिली. अन् आता त्याला ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कारा’नं गौरवण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या