मुंबई, 22 फेब्रुवारी: लोकप्रिय अभिनेत्री अनिता हसनंदानी (TV actress Anita Hassnandani) आणि उद्योजक रोहित रेड्डी (businessman Rohit Reddy) नुकतेच 9 फेब्रुवारी रोजी आई-बाबा (became parents) झाले. अनिताची बेस्टफ्रेंड निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) हिनं एक व्हिडिओ पोस्ट करत याची माहिती दिली होती.
आता 9 फेब्रुवारी रोजी या दोघांनी मुलाच्या स्वागतासाठी केलेला एक गंमतीदार (innovative video viral) व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यात सुरुवातीला अनिता आणि रोहित दिसतात. अनिताच्या बेबी बम्पवर (baby bump) एक फटाका काळ्या रंगात रंगवलेला आहे. रोहित त्याची वात पेटवण्याची ऍक्शन करतो. पुढच्याच सेकंदाला फटाका (firecracker) जोरात फुटून अनिता आणि रोहितच्या हातात बाळ अवतरतं. तिघांचेही चेहरे फटाक्याच्या राखेनं काळे झालेले दिसतात.
बाळाच्या आगमनाची माहिती देणारा हा भन्नाट आणि इनोव्हेटिव्ह व्हिडिओ नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे. आजवर या व्हिडिओला तब्बल 6 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. सोबतच 2 हजारांहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.
अनिता आणि रोहितनं आपल्या मुलाचं नाव आरव ठेवलं आहे.
View this post on Instagram
वयाच्या 39 व्या वर्षी अनिता आई झाली. 14 ऑक्टोबर 2013 रोजी दोघांचं लग्न झालं होतं. लग्नाच्या सात वर्षानंतर दोघांनी हा निर्णय घेतला. टीव्हीवरच्या लोकप्रिय मालिका 'नागीन', 'ये है मोहब्बते' यातून अनिता घराघरात पोचली. सर्वात शेवटी अनिता नागीन मालिकेत दिसली होती. अनितानं नागीन 3 आणि नागीन 4 मध्ये महत्त्वाची भूमिका केली होती.
हेही वाचालग्नाच्या पाच दिवसानंतर दिया मिर्झा प्रेग्नेंट? 'या' फोटोंमुळे चर्चांना उधाण
याशिवाय अनिता नच बलिये-9 मध्येही पतीसोबत दिसली होती. अनिता अभिनयासोबतच आपल्या स्टाईलसाठीही ओळखली जाते. आपले आकर्षक फोटो आणि व्हिडिओज ती सतत सोशल मीडियावर शेअर करत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anita hassanandani, Instagram, Viral video.