JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सोनू सूदविरोधात BMC ची तक्रार; रहिवासी इमारतीमध्ये हॉटेल सुरू केल्याचा आरोप

सोनू सूदविरोधात BMC ची तक्रार; रहिवासी इमारतीमध्ये हॉटेल सुरू केल्याचा आरोप

कंगना रणौतनंतर (Kangna Ranaut) बीएमसीने (BMC) सोनू सूदवर (Sonu Sood) देखील कारवाईचा बडगा उपसला आहे. आता सोनू सूदच्या इमारतीवरही बीएमसीचा बुलडोजर फिरणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 जानेवारी: अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangna Ranaut) घरावर आणि ऑफिसवर कारवाई केल्यानंतर आता बीएमसीने (BMC) सोनू सूदकडे (Sonu Sood) आपला मोर्चा वळवला आहे. जुहू परिसरात सोनू सूदच्या मालकीची 6 मजली इमारत आहे. ही इमारत रहिवासी इमारत असूनदेखील या इमारतीमध्ये सोनू सूदने परवानगी न घेता हॉटेल सुरू केलं असा आरोप बीएमसीने केला आहे. त्यामुळे MRTP ( Maharashtra Region & Town Planning) कायद्याअंतर्गत सोनू सूद विरोधात लिखित तक्रार बीएमसीने जुहू पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. बीएमसीने आरोपांमध्ये म्हटलं आहे की, ‘जुहूच्या ज्या परिसरात सोनू सूदची 6 मजली इमारत आहे तो रहिवासी भाग आहे. अभिनेता सोनू सूदने कोणत्याही परवानगीशिवाय तिथे हॉटेल सुरू केलं आहे. तसंच या इमारतीमध्ये अवैधरित्या काही स्ट्रक्चरल बदल केले आहेत. याबद्दल बीएमसीने सोनू सूदला नोटीसही पाठवली होती.’

संबंधित बातम्या

लॉकडाऊनच्या काळात हजारो गरीब मजुरांना सोनू सूदने स्वत:च्या पैशांनी घरी पाठवण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे अनेक लोकं त्याला देव मानतात. सोनू सूदच्या त्या कृतीलादेखील शिवसेनेकडून ‘हा राजकीय डावेपच’ असल्याचा आरोप केला झाला होता. त्यानंतर सोनू सूदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. दरम्यान आता बीएमसीकडून तक्रार दाखल झाल्यानंतर सोनू सूद काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या