JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेत्री आणि भाजप नेत्या कार अपघातातून थोडक्यात बचावल्या, घातपाताचा संशय

अभिनेत्री आणि भाजप नेत्या कार अपघातातून थोडक्यात बचावल्या, घातपाताचा संशय

‘आमची गाडी ही योग्य लेनमधून चालली होती. मात्र, अचानक एका भरधाव टँकरने आमच्या कारला जोरात धडक दिली’

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चैन्नई, 18 नोव्हेंबर : दक्षिणेतील स्टार अभिनेत्री आणि अलीकडेच काँग्रेसमधून भाजपमध्ये (BJP) दाखल झालेल्या खुशबू सुंदर (Kushboo Sundar) यांच्या कारला अपघात (car accident) झाला आहे. सुदैवाने या अपघातातून सुशबू सुंदर थोडक्यात बचावल्या आहे.  या अपघाताच्या मागे घातपात असल्याचा संशय वर्तवण्यात आला आहे. आज सकाळी खुशबू सुंदर यांच्या गाडीला अपघात झाला. हा अपघात मेलमरवाथूरजवळ झाला. खुशबू सुंदर एका कार्यक्रमासाठी कडलोरे इथं जात होत्या, त्यावेळी हा अपघात घडला. याबद्दल खुशबू सुंदर यांनी ट्वीट करून घटनेची माहिती दिली.  ‘आमची गाडी ही योग्य लेनमधून चालली होती. मात्र, अचानक एका भरधाव टँकरने आमच्या कारला जोरात धडक दिली. कारच्या डाव्याबाजूला ही जबर धडक बसली. आमची कार ही टँकरवर आदळली नाही’, असं खुशबू सुंदर यांनी सांगितले.

तसंच, खुशबू सुंदर यांनी आपल्या समर्थकांचे आभार मानले आहे. आपण मुरुगन देवाच्या कृपेने अपघातातून बचावल्याचंही त्यांनी ट्वीटमध्ये सांगितले आहे. या अपघातानंतर आपला कडलोर दौरा हा सुरूच राहणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर कंटेनरने आपल्या कारला धडक दिली आहे. कारही योग्य लेनमधून जात होती. तेवढ्यात कंटेनरने धडक दिली. त्यामुळे प्रसारमाधम्यांनी याचा विचार करावा, असंही आवाहनही त्यांनी केले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. त्याचबरोबर कंटेनर चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या