JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रोहित विकासमध्ये जबरदस्त हाणामारी; Bigg Boss नं दाखवला थेट जेलचा रस्ता

रोहित विकासमध्ये जबरदस्त हाणामारी; Bigg Boss नं दाखवला थेट जेलचा रस्ता

बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्यांदाच बिग बॉसच्या जेलचा दरवाजा उघडणार आहे. रोहित आणि विकास यांनी केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून जेलमध्ये जाण्याची वेळ येणार आहे.

जाहिरात

रोहित आणि विकास जेलमध्ये

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 नोव्हेंबर : बिग बॉस मराठी च्या घरात  सदस्यांची एंट्री होऊन आता 50 दिवस उलटून गेले आहेत. आतापर्यंत सदस्यांनी अनेक टास्क खेळले, एकमेकांशी भांडणं केली, शाब्दिक चमकमी झाल्या. पण आता 50 दिवसांनी सदस्यांची घरात राहण्यासाठी होणारी चुरस त्यांच्या अंगाशी आल्याचं पाहायला मिळत आहे. जिंकण्याच्या उद्देशानं सदस्य कोणाचीही पर्वा करताना दिसत नाहीत. हत्ती आणि राणी मुंगीच्या टास्कमध्ये अमृता धोंगडेनं बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टीचं केलेल्या नुकसानीमुळे अमृताला बिग बॉसनं कठोर शिक्षा दिली आहे. पण अमृतानं केलेल्या कृत्याचा धडा न घेता सदस्यांनी घरात पुन्हा एकदा नको ते पाऊल उचललं आहे. विकास आणि रोहित यांच्यात झालेल्या मारामारीमुळे आता बिग बॉसनं त्यांना जेलमध्ये टाकलं आहे. विकास आणि रोहित जेलमध्ये गेल्यानं घरात नवा ट्विस्ट तयार झाला आहे. बिग बॉसच्या आजच्या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यात साखर आणि मुंगीच्या टास्कमध्ये विकास आणि रोहित यांच्यात हाणामारी पाहायला मिळत आहे. टास्क खेळत असताना रोहित आणि विकासमध्ये धक्काबुक्की झाली. ज्यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यावरून रोहित विकासला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेला. दोघांची भांडणं सोडवण्यात घरातील इतर सदस्यांची चांगलीच तारांबळ उडाली.  समोर आलेल्या प्रोमोमधील भांडण पाहून प्रेक्षकही हैराण झालेत. हेही वाचा - Ruchira jadhav : बिग बॉसमधून बाहेर पडताच रुचिरा डेटवर; पोस्ट करत म्हणाली ‘शेवटी जाऊन भेटलेच त्याला…’

संबंधित बातम्या

विकास आणि रोहित यांचं भांडण बिग बॉसनं चांगलंच खटकलं. दोघांनाही शिक्षा म्हणून त्यांना थेट जेलचा रस्ता दाखवला आहे. रोहित आणि विकास यांना बिग बॉसनं जेलमध्ये टाकलं आहे. बिग बॉस मराठीच्या चोथ्या सीझनमध्ये जेलमध्ये जाणारे रोहित आणि विकास पहिले स्पर्धक आहेत. दोघांना जेलमध्ये टाकल्यानं घरातील इतर सदस्य टेन्शनमध्ये आले आहेत.

रोहित विकासला जेलमध्ये टाकल्यानंतर आता दोघे जेलमध्ये भांडण करणार का अशी भिती सगळ्यांना आहे. आता दोघे आतमध्ये एकमेकांशी बोलणार का? दोघांचं भांडण मिटणार का? तसंच बिग बॉसनं दोघांना दिलेली ही शिक्षा किती दिवसांची असणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना प्रोमो पाहून पडले आहेत. आजच्या भागात या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या