मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'स्वार्थीपणा करतोय विकास...'; स्पेशल पॉवर मिळताच किरण मानेंचा विकासवर निशाणा

'स्वार्थीपणा करतोय विकास...'; स्पेशल पॉवर मिळताच किरण मानेंचा विकासवर निशाणा

बिग बॉस मराठी 4

बिग बॉस मराठी 4

सोशल मीडियावर सर्वत्र एकच गाजावाजा पहायला मिळतोय तो म्हणजे 'बिग बॉस मराठी 4'. दिवसेंदिवस शो अधिक रंजक होत चालला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 22 नोव्हेंबर : सोशल मीडियावर सर्वत्र एकच गाजावाजा पहायला मिळतोय तो म्हणजे 'बिग बॉस मराठी 4'. दिवसेंदिवस शो अधिक रंजक होत चालला आहे. आत्तापर्यंत बिग बॉसच्या घरातून सहा सदस्यांची एक्झिट झाली आहे. त्यामुळे पुढचा सातवा सदस्य कोण असणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. तत्पूर्वी सध्या घरामध्ये मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे. किरण मानेंकडे बिग बॉसने मोठी सिक्रेट पॉवर दिली असून ते घरातील सदस्यांवर नजर ठेवू शकतात. त्यांच्या मागे त्यांच्याविषयी कोण काय बोलतंय यावर त्यांचं लक्ष आहे. नुकताच आज होणाऱ्या भागाचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये किरण माने विकासविषयी बोलत आहेत.

आज होणाऱ्या भागाचा एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये किरण माने सिक्रेट रुममध्ये बसून घरातील सदस्यांवर नजर ठेवत आहेत. व्हिडीओमध्ये दिसतंय की, प्रसाद तेजस्विनीचा ग्रुप बोलत आहे. दुसरीकडे किरण माने म्हणतायेत की, विकास अत्यंत स्वार्थीपणा करतोय विकास. तेजस्विनी अमृता किती काळजी करतात त्याची तो या ग्रुपकडे डोकवूनही पाहत नाहीये. त्यामुळे आता विकास आणि किरण मानेंच्या मैत्रित मोठी दरी पडल्याचं दिसून येतंय.

आजच्या भागात आपल्याला अजून कॅप्टन्सी स्पेशल टास्कही पहायला मिळणार आहे. आज होणाऱ्या भागात स्पर्धकांना कॅप्टन्सी मिळवण्यासाठी स्पेशल टास्क दिलं आहे. टीमला कॅप्टन पदाचा अधिकार मिळण्यासाठी दोन्ही टीममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. हे कार्य असं आहे कि, 'जी टीम घरातील हत्तीच्या गळ्यात जास्तीत जास्त हार घालेल त्या टीमला कॅप्टन पद मिळेल. आता त्या हत्तीच्या गळ्यात हार घालण्यासाठी स्पर्धक एकमेकांत भिडले आहेत. एका टीममध्ये अपूर्वा आणि अक्षय तर दुसऱ्या टीममध्ये प्रसाद आणि तेजस्विनी खेळत आहेत.

आत्तापर्यंत बिग बॉसच्या घरातून सहा स्पर्धक बाहेर पडले असून यामध्ये निखिल राजेशिर्के, मेघा घाडगे, योगेश जाधव, त्रिशूल मराठे, रुचिरा जाधव, यशश्री मुसारकर आहेत. आता बिग बॉसच्या घरातील बाहेर पडणारा पुढचा स्पर्धक कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. घरातील सगळ्यांना सध्या किरण माने घराबाहेर गेले असल्याचं सांगण्यात आलंय मात्र ते बिग बॉसच्या घरात असून त्यांना स्पेशल पॉवर मिळाली आहे. त्यामुळे ते सध्या सिक्रेट रुममध्ये आहे.

First published:

Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi entertainment, Marathi news