मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ruchira jadhav : बिग बॉसमधून बाहेर पडताच रुचिरा डेटवर; पोस्ट करत म्हणाली 'शेवटी जाऊन भेटलेच त्याला...'

Ruchira jadhav : बिग बॉसमधून बाहेर पडताच रुचिरा डेटवर; पोस्ट करत म्हणाली 'शेवटी जाऊन भेटलेच त्याला...'

रुचिरा जाधव

रुचिरा जाधव

बिग बॉसमुळे रोहित रुचिराच्या नात्यात दुरावा आलाय का? त्यांचं पुढे काय होणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला. अशातच आता रुचिराच्या इंस्टाग्राम पोस्टनं लक्ष वेधलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 24 नोव्हेंबर: बिग बॉस मराठीच्या घरातून अभिनेत्री रुचिरा जाधव घराबाहेर पडली. पण घरातून बाहेर निघताना रुचिरा आणि रोहित यांच्यात काही वाद झाले होते. ज्यानं रुचिरा नाराज होती. घराबाहेर पडताना देखील तिनं 'रोहितला बाहेर आल्यावर बोलू तुला माहिती आहे रुचिरा काही विसरत नाही', असं म्हटलं होतं. यावरून दोघांमध्ये वाद झालेत हे लक्षात आलं. तर घराबाहेर येताच रुचिरानं रोहितला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केलं. यावरून बिग बॉसमुळे रोहित रुचिराच्या नात्यात दुरावा आलाय का? त्यांचं पुढे काय होणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला. अशातच आता रुचिराच्या इंस्टाग्राम पोस्टनं  लक्ष वेधलं आहे.

रुचिराने घराबाहेर पडताच मोकळा श्वास घेतला होता. बिग बॉसमधून बाहेर पडताच रुचिरा तिच्या आवडीच्या ठिकाणी म्हणजेच तिच्या घरी पोहचली होती. आता ती पुन्हा एकदा आवडीच्या ठिकाणी पोहचली आहे. रुचिरा नुकतीच तिच्या आवडीच्या व्यक्तीला भेटीला एका सुंदर ठिकाणी पोहचली आहे. रुचिराने  रोहितला अनफॉलो केल्यावर रुचिरानं केलेल्या त्या पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा आहे.

हेही वाचा - Bigg Bossमधील भांडणाचा रोहित रुचिराच्या नात्यावर परिणाम? पाहा काय म्हणाली अभिनेत्री

रुचिरानं  इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत लिहिलं आहे कि, ''50 days च्या gap नंतर जाऊन भेटलेच त्याला. पहिल्यांदाच आमच्या भेटीत इतक्या दिवसांचं अंतर होतं. ४२ दिवस त्याने वाट बघायला लावली, मग मी म्हटलं त्यालाही थोडी वाट बघूदेत. खूप दिवसांनंतर मोकळं आभाळ बघून छान वाटलं. माय  सेकण्ड डेट. ज्याला भेटण्यासाठी मी तयार झाले होते.'' अशी पोस्ट रुचिराने केली आहे. ही पोस्ट कोणत्या व्यक्तीसाठी नसून चक्क सूर्यासाठी लिहिली आहे. रुचिराच्या या पोस्टचं  कॅप्शन वाचून चाहत्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला होता.

रुचिरा आणि रोहित विषयी सांगायचं तर NEWS18लोकमतशी संवाद साधताना रुचिरानं तिच्या आणि रोहितच्या नात्यावर बिग बॉसमधील भांडणाचा काही परिणाम होणार का? यावर भाष्य केलं. रोहितबरोबरच्या नात्याविषयी बोलकाना रुचिरा म्हणाली, 'आमचं नातं इतकं तकलादू नव्हतं की कोणत्याही गोष्टीमुळे ते पटकन तुटेल. पण काही गोष्टी घडतात त्याकडे दर्लक्ष करून चालत नाही. त्यामुळे काही गोष्टी बोलून सॉल होतील असा मला विश्वास आहे.  आतमध्ये मी स्वत:ला अनेक कंट्रोलमध्ये ठेवलं. मी माझ्याकडून खूप इनपुट दिले अर्थात समोरूनही आले. पण मला आता थोडासा वेळ हवाय तो मला घेऊ देत. आता मला माझी काळजी घ्यायची आहे.

तसंच  लग्नाविषयी बोलताना रुचिरा म्हणाली होती कि, ''आम्ही बिग बॉसच्या घरात जातानाही आमची फॅमिली लग्नाविषयी बोलली होती. पण लग्नाच्या गोष्टी आम्ही आमच्या हातात ठेवल्या आहेत. त्यात आम्ही आमच्या फॅमिलीची मतही ग्राह्य धरतो. माझ्यासाठी माझी फॅमिली आणि माझं करिअर या गोष्टींसाठी प्रायोरिटी आहे. रोहित माझ्या फॅमिलीचाच एक भाग आहे. त्यामुळे आताच्या क्षणी माझं करिअर हिचं माझी प्रायोरिटी आहे आणि हे फिक्स आहे', असं रुचिरानं सांगितलं होतं.

First published:

Tags: Bigg boss marathi, Marathi actress