**मुंबई, 15 नोव्हेंबर :**बिग बॉस मराठीच्या घरातून दर आठवड्याला सदस्य आऊट होत आहेत. मागच्या चावडीला अभिनेत्री रुचिरा जाधवला घरातून एक्झिट घ्यावी लागली. रोहितबरोबर रुचिरानं घरात एंट्री घेतली. रोहित आणि रुचिरा ही बिग बॉस मधील पहिली कपल एंट्री होती. दोघांच्या एंट्रीनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. दोघांनी बिग बॉसच्या घरात आपापल्या पद्धतीनं गेम खेळला. मात्र शेवटच्या दिसता दोघांमध्ये भांडणं झाली आणि त्याच दिवशी रुचिराला घराबाहेर पडावं लागलं. आता या दोघांच्या नात्यात काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण घराबाहेर पडताच रुचिरानं रोहितला अनफॉलो केल्याचं दिसत आहे. त्याचदरम्यान आता अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये रोहित ढसाढसा रडताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात ‘सोशल मीडिया’ ही या आठवड्याची थीम असणार आहे. या थीममध्ये बिग बॉसच्या घरातील सदस्यांना सोशल मीडियावर चर्चेत राहायचा टास्क दिला आहे. त्यासाठी हे स्पर्धक वाटेल ते करू शकतात. आता अजून एका व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत स्पर्धक ‘सोसल तितकंच सोशल’ हे कार्य पार पडणार आहे. ‘सोसल तितकंच सोशल’ या साप्ताहिक कार्यात स्पर्धकांना आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करायचा आहे. हेही वाचा - बिग बॉसमुळे लव्हबर्ड्सच्या नात्याला तडा? घरातून बाहेर पडताच रुचिरानं केलं रोहितला अनफॉलो या कार्यात आता अक्षय रोहितला रुचिराचा त्याग करायला सांगतो. या दरम्यान तो रोहितला रुचिराचा फोटो फाडायला सांगतो. हे करताना रोहित मात्र चांगलाच दुखावला जातो आणि रडायला लागतो. आता रोहित खरंच रुचिराचा फोटो फेडणार का ते बघणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान सोशल मीडियावर बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच रुचिरानं रोहितला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचं पाहायला मिळत आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर आता खरा खेळ सुरू झाला आहे का असं म्हणण्याची वेळ आहे का? असा प्रश्न दोघांच्या चाहत्यांना पडला आहे. कारण रोहित आणि रुचिरा सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय आहेत. दोघांची केमिस्ट्री दाखवणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिथे पाहायला मिळतात. आता रुचिराचं रोहितला अनफॉलो करणं बिग बॉसच्या थीमचाच एक भागसुद्धा असू शकतो. कारण सोशल मीडियावर चर्चेत राहणं हे टास्क या आठवड्यात स्पर्धकांना दिल आहे.
रुचिराच्या इन्स्टाग्रामवर रोहित रुचिराला फॉलो करतोय. पण रुचिरा मात्र रेहितला फॉलो करत नाहीये. पण दोघांच्या अकाऊंटवर एकमेकांचे फोटो आणि रील्स व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. मात्र इन्स्टाग्रामवर रुचिरानं रोहितला अनफॉलो केल्याचं पाहून चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. आता हा सगळा टास्कचा भाग आहे कि रोहित रुचिराच्या नात्याला खरंच तडा गेलाय हे येणाऱ्या काळातच समजेल.