JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'अरे रे अरे ये क्या हुआ': गाण्यावरील अंकिताचे एक्सप्रेशन पाहून चाहते म्हणाले,...

'अरे रे अरे ये क्या हुआ': गाण्यावरील अंकिताचे एक्सप्रेशन पाहून चाहते म्हणाले,...

अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आपले डान्स व्हिडीओ (Dance Video) शेअर करत आहे. आता अभिनेत्रीनं एका गाण्यावर एक्सप्रेशन देतानाचा आपला खास व्हिडीओ शेअर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 10 फेब्रुवारी : अभिनेत्री अंकिता लोखंडेचा (Ankita Lokhande) चाहता वर्ग खूप मोठा आहे. पवित्र रिश्ता(Pavitra Rishta) या छोट्या पद्यावरील मालिकेच्या माध्यमातून अंकिता घरोघरी पोहोचली. काही दिवसांपूर्वीच अंकितानं कंगना रणौतच्या मणिकर्णिका या सिनेमातून बॉलिवूडमध्येही एन्ट्री केली. तिच्या या सिनेमातील अभिनयाचं चाहत्यांनी भरपूर कौतुकही केलं. यानंतर लॉकडाऊनच्या काळात चित्रीकरण बंद असलं तरी अंकिता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहिली. नुकतंच अंकितानं आपला आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. अंकितानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री अरे रे अरे ये क्या हुआ या गाण्यावर एक्सप्रेशन देताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. अवघ्या दोन तासात व्हिडिओला तब्बल 45 हजार लाईक मिळाले आहेत. तर, अनेक चाहते अंकिताच्या या व्हिडीओवर कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीनं काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. या व्हिडीओला अंकितानं खास कॅप्शनही दिलं आहे. व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये अंकितानं लिहिलं, आपण परिधान केलेल्या सर्व गोष्टींपेक्षा तुमचे हवभाव सर्वात महत्त्वाचे असतात. याआधी काही दिवसांपूर्वीच अंकितानं आपला आणखी एक डान्स व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ती माधुरी दीक्षितच्या ‘धक धक करने लगा’ या गाण्यावर थिरकताना दिसली होती. अभिनेत्रीचा हा व्हिडीओदेखील चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. सोबतच व्हायरलही झाला होता.

संबंधित बातम्या

अभिनेत्री सध्या विकी जैनसोबत रिलेशनशिपमध्ये असून लवकरच दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत. त्याआधी अंकिता सुशांत सिंह राजपूतसह रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, काही कारणांमुळे दोघांचा ब्रेकअप झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या