JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज; Thank You सिनेमाची घोषणा

अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज; Thank You सिनेमाची घोषणा

नव्या वर्षात अनेक नव्या सिनेमांची घोषणा केली जात आहे. थँक यू सिनेमाच्या निमित्ताने अजय देवगण (Ajay Devgan), सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 जानेवारी :  अजय देवगण (Ajay Devgan), सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) लवकरच आपल्याला एका नव्या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. ही किमया घडवली आहे, दिग्दर्शक आणि निर्माते इंद्र कुमार आणि भूषण कुमार यांनी. थँक यू (Thank You) या नव्या सिनेमात बॉलिवूडचे हे तीन दिग्गज कलाकार एकत्र झळकणार आहेत. रकुल प्रीत आणि अजय देवगणने एकत्र काम केलं आहे. पण आता या तिघांची जोडी पहिल्यांदाच दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. ड्रग केसमध्ये अडकल्यानंतर रकुलप्रीत सिंहच्या कारकिर्दीवर शंका उपस्थित केल्या जात होत्या मात्र दिग्दर्शक आणि निर्माते तिला पसंती देत आहेत. येत्या काळात रकुल प्रीत सिंह काही दाक्षिणात्य सिनेमामतही दिसणार आहे. कोरोनातून ती नुकतीच बरी झाली असेल. थँक यू या सिनेमाचं शूटिंग 21 जानेवारी 2021 पासून सुरू होणार आहे. हा कॉमेडी सिनेमा आहे पण प्रेक्षकांना हसवतानाच सिनेमाच्या शेवटी एक छानसा संदेशही देण्यात येणार आहे. तरण आदर्श यांनी ट्वीट करत या सिनेमाबद्दल माहिती दिली.

संबंधित बातम्या

सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक इंद्र कुमार म्हणाले, ‘अजय देवगणला मी बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. पण रकुल प्रीत आणि सिद्धार्थ या नव्या दमाच्या कलाकारांसोबत काम करताना मजा येणार आहे.’ थँक यू चित्रपटासोबत अजय देवगण प्रेक्षकांना मैदान, RRR आणि त्रिभंगा या सिनेमामधूनही लवकरच दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या