JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सोनू सूदनंतर रिया चक्रवर्तीचा कोरोना ग्रस्तांना मदतीचा हात; सोशल मीडियावर म्हणाली...

सोनू सूदनंतर रिया चक्रवर्तीचा कोरोना ग्रस्तांना मदतीचा हात; सोशल मीडियावर म्हणाली...

रिया गेले अनेक महिने मीडिया तसेच सोशल मीडियापासून (social media) दूर आहे. पण आता तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. त्यात तिने आपण मदतीसाठी आपला इनबॉक्स खुला केला असल्याचं म्हटलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 एप्रिल : मुंबईसह देशभरातील कोरोनाची परिस्थिती (corona pandemic) सध्या अत्यंत बिकट होत चालली आहे. कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर ठरत आहे. तर आरोग्यव्यवस्थाही मोठ्या संकटात सापडली आहे. ऑक्सिजन सिलेंडर्स (oxygen cylinders) , औषध, बेड्स यांचा साठा अपूरा पडत आहे. परिणामी रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. अनेक सेलिब्रिटी आता मदतीचा हात पुढे करत आहेत. अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) हा मागील वर्षभरापासून नागरीकांची मदत करत आहे. तर आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) ही मदतीचा हात पुढे केला आहे. रिया गेली अनेक महिने मीडिया तसेच सोशल मीडियापासून (social media) दूर आहे. पण आता तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. त्यात तिने आपण मदतीसाठी आपला इनबॉक्स खुला केला असल्याचं म्हटलं. रियाने पोस्ट मध्ये लिहील, ‘कठीण काळात एकजुटीची गरज आहे, ज्यांना मदत करू शकता त्या सगळ्यांना मदत करा. मदत लहान किंवा मोठी.. मदत मदत असते, मला मेसेज करा, जर मी काही करू शकत असेन तर नक्की करीन. काळजी घ्या आणि सगळ्यांना खूप प्रेम’. रियाने अशाप्रकारे मदतीचा हात पुढे केला आहे. रिया अनेक महिन्यानंतर आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय होऊ लागली आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput)  मृत्युनंतर रियावर गंभीर आरोप झाले होते. तर त्यानंतर ड्रग्स प्रकरणात एनसीबी (NCB) ने तिला अटक केली होती.

दीपिका पादुकोणच्या हातातील या छोट्याशा घड्याळाच्या किमतीत तुम्ही एक घर घेऊ शकता; आकडा पाहूनच उंचावतील भुवया

तर तब्बल एक महिना तिला जेल मध्ये काढावा लागला होता. पण त्यानंतर पुराव्याअभावी तिची सुटका झाली. लवकरच रिया ‘चेहरे’ (Chehre)  या चित्रपटात बिग बी अमिताब बच्चन (Amitabh Bacchan) आणि इमरान हाश्मी (Imran Hashmi) यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या