JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / भारतातील कोरोना स्थितीबाबत प्रियांका चोप्रानं व्यक्त केली चिंता; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे मदतीची मागणी

भारतातील कोरोना स्थितीबाबत प्रियांका चोप्रानं व्यक्त केली चिंता; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे मदतीची मागणी

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिनं भारतात (India) कोरोनामुळे (Corona Second Wave)उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तिनं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे (US President) मदतीची मागणी केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 27 एप्रिल: अमेरिकेत (USA) स्थायिक झालेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिनं भारतात (India) कोरोनामुळे (Corona Second Wave) उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तिनं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे (US President) मदतीची मागणी केली आहे. भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या अतिशय झपाट्यानं वाढत असल्यानं ऑक्सिजनचा भीषण तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनअभावी रोज अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. सगळीकडे अक्षरश: हाहाकार माजला आहे. सरकार युद्धपातळीवर ऑक्सिजन पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातील ही सगळी परिस्थिती बघून अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं दुःख व्यक्त केलं आहे. प्रियांकानं ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात तिनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांना टॅग करत भारताला कोविड-19 च्या लसीसाठी (Covid-19 Vaccine) मदत करण्याचं आवाहन केलं आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या कोविड-19च्या लसीसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या निर्यातीवर अमेरिकनं निर्बंध घातल्यानं लस निर्मितीत अडथळा निर्माण झाला आहे. भारतातील सीरम इन्स्टिट्युट अमेरिकेतील अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड यांनी विकसित केलेल्या लसीचं उत्पादन करत आहे. तसंच अमेरिकेनं लस उत्पादक कंपन्यांकडून जरूरीपेक्षा अधिक लसींची खरेदी केली आहे. या सगळ्यामुळे लसींची उपलब्धता कमी झाल्यानं भारतात अनेक ठिकाणी लसीकरण मोहीम ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रियांका चोप्रा हिनं ही मागणी केली आहे. आपल्या ट्विटमध्ये तिनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना टॅग करत म्हटलं आहे की,‘भारतात कोविड-19 चे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि अमेरिकेनं गरजेपेक्षा अधिक 550 दशलक्ष लसीचे डोस मागवले आहेत. अॅस्ट्राझेनेकानं विकसित केलेली लस जगभरात उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले आभार. पण माझ्या देशात परिस्थिती गंभीर आहे. तुम्ही भारतासाठी तत्काळ लस उपलब्ध कराल का?’. हॉलिवूडमध्येही (Hollywood) छाप उमटविणारी प्रियांका चोप्रा सध्या अमेरिकेत असली तरी ती कोविड-19च्या साथीत भारतासाठी मदत मिळवण्याबाबत तसंच आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करण्यासाठीही प्रयत्नशील आहे. आपल्या जागतिक पातळीवरील प्रतिमेचा वापर करून प्रियांका भारताला मदत करण्याकरता जगभरातील विविध देशांच्या सामुहिक प्रयत्नांना हातभार लावत आहे. सध्या भारताला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी अनेक देश पुढे सरसावले असून, अमेरिका, जर्मनी, सौदी अरेबिया आदी विविध देशांनी ऑक्सिजन कंटेर्न्स पाठवले आहेत. अनेक देशांनी भारताला मदतीची हमी दिली असून भारताच्या या लढ्यात आपला पाठिंबा दर्शवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या