मुंबई 7 फेब्रुवारी : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) नेहमीच वेगवेगळ्या अंदाजात चाहत्यांसमोर येत असते. अभिनयासोबत नियाच्या स्टाईलचीही मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते. अनेकदा ती नवनवीन स्टाईलचे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंतीही मिळते. मात्र, आता स्टाईल म्हणून घातलेल्या एक ड्रेसमुळे अभिनेत्री चांगलीच ट्रोल झाली आहे. निया शर्मानं (Nia Sharma Photos) आपले दोन फोटो नुकतेच शेअर केले आहेत. यामध्ये ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिनं या ड्रेससोबत मँचिंग टोपी आणि शूजही घातले आहेत. यातील एका फोटोमध्ये ती खुर्चीमध्ये बसून आराम करत आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये एका लक्झरी गाडीशेजारी उभा राहून पोज देत आहे.
यूजर्सनं केलं ट्रोल - या फोटोंमधील निया शर्माचा अंदाज तिच्या फॉलोअर्सला मात्र आवडला नाही. यूजर्सनं तिच्या या फोटोंवर मजेशीर कमेंट करण्यास सुरूवात केली आहे. नियाच्या या फोटोमध्ये दिसणारा तिचा हा ड्रेस काही चाहत्यांना छत्री, काहींना गाडीचा कव्हर आणि काहींना तर कचऱ्याची पिशवी वाटत आहे. इतकंच नाही, एका यूजरनं असंही लिहिलं, की ‘गाडी वाला आया घर से कचरा निकाल’ व्हायरल झाले फोटो - निया शर्माचे हे फोटो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 2 दिवसातच या फोटोला 2 लाखापेक्षा अधिक लोकांनी लाईक केलं आहे. मात्र, यावर आलेल्या कमेंट पाहून तुम्हीही मोठमोठ्यानं हसू लागाल. मात्र, असंही नाही की कमेंट करणाऱ्यांमध्ये सगळे ट्रोलर्सच आहे. अनेकांनी नियाच्या आत्मविश्वासाच कौतुकही केलं आहे. जमाई राजा 2.0 मध्ये झळकणार - कामाबद्दल बोलायचं झाल्यास, आता निया शर्मा आणि रवि दुबे यांच्या सीरिजचा दुसरा सीजन ‘जमाई राजा 2.0’ (Jamai Raja 2.0 Season 2) प्रदर्शित होणार आहे. याचा टीजर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची याबद्दलची उत्कंठा आणखीच वाढली आहे. हा टीजर काही दिवसांपूर्वीच ZEE5 premium च्या इन्स्टाग्रावरुन प्रदर्शित करण्यात आला होता. सीरिजचा पुढचा सीजन26 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांना पाहाता येणार आहे.