JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेते किशोर नांदलस्कर यांचा शेवटचा VIDEO VIRAL; पाहून तुमचेही डोळे पाणावतील

अभिनेते किशोर नांदलस्कर यांचा शेवटचा VIDEO VIRAL; पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Kishor Nandlaskar video goes viral: ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 22 एप्रिल: मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी चित्रपटांतही आपल्या भूमिकेने सर्वांची मनं जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर (Kishor Nandlaskar) यांचे 20 एप्रिल 2021 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह चाहत्यांनाही एक मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. किशोर नांदलस्कर यांच्या निधनानंतर आता त्यांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल (Kishor Nandlaksar birthday celebration video viral) होत आहे. आपल्या अभिनयाने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते किशोर नांदलस्कर यांचा सोशल मीडियात व्हायरल होणारा हा व्हिडीओ वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा आहे. हा व्हिडीओ 17 मार्च रोजीचा असल्याची माहिती समोर आली आहे. त्या दिवशी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. हा व्हिडीओ पाहून सर्वांचेच डोळे पाणावत आहेत.

या व्हिडीओत आपल्याला पहायला मिळत आहे की, किशोर नांदलस्कर हे वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्यासोबत कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित असून केक कापून लहान मुलांना भरवतानाही दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये किशोर नांदलस्कर हे नाचताना दिसत आहेत. यावेळी इतर उपस्थितांपैकी काहीजण गाणी सुद्धा गाताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या

मनोरंजन विश्वातील ‘राजा’ हरपला, ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन किशोर नांदलस्कर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ठाण्यातील बाळकुम परिसरात असलेल्या मनपाच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना दुर्दैवाने त्यांचे निधन झाले.

जाहिरात

किशोर नांदलस्कर यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेमांतही भूमिका करुन प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली होती. त्यांनी 40 नाटक, 20 हून अधिक मालिका, 30 हून अधिक मराठी सिनेमांत तर अनेक बॉलिवूड सिनेमांत भूमिका केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या