मुंबई 26 एप्रिल**:** 2020 हे वर्ष भारतीय मनोरंजनसृष्टीसाठी अत्यंत दुदैवी ठरलं. देशातील एस. सुब्रमण्यम, आशालता वाबगावकर, जगदीप, सुशांत सिंह राजपूत, सरोज खान, ऋषी कपूर यांसारखे अनेक नामांकित कलाकार काळाच्या पडद्याआड गेले. यापैकी भानू अथैया (Bhanu Athaiya) आणि इरफान खान (Irrfan Khan) या दोघांना यंदाच्या ऑस्कर पुरस्कार (Oscar 2021) सोहळ्यात आदरांजली देण्यात आली आहे. ऑस्कर सोहळ्यात दरवर्षी चित्रपटसृष्टीसाठी महत्वाचं योगदान देणाऱ्या दिवंगत कलाकारांना आदरांजली दिली जाते. यंदाच्या वर्षी या जागतिक कलाकारांच्या यादीत अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) आणि वेशभूषाकार भानू अथैया (Bhanu Athaiya) यांचा देखील सामावेश करण्यात आला आहे. एका खास डॉक्युमेंट्रीद्वारे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. भानू अथैया या ऑस्कर पटकावणाऱ्या भारतातील पहिल्या कलाकार होत्या. त्यांना गांधी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार या विभागात ऑस्कर मिळाला होता. इरफाननं ऑस्कर पटकावला नसला तरी हॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तो झळकला होता. आपल्या कॉमिक टाईमिंगनं त्यांनं हॉलिवूड प्रेक्षकांनाही अवाक् केलं होतं. त्याच्या मृत्यूमुळं विदेशी प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला होता. हॉलिवूडमधील अनेक नामांकित दिग्दर्शकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली होती. अन् आता या दोन्ही कलाकारांच्या आठवणींना ऑस्कर सोहळ्यात देखील उजाळा देण्यात आला आहे. अवश्य पाहा - Oscar जिंकणाऱ्या कलाकारांना किती रुपयांचं बक्षिस मिळतं?; रक्कम पाहून व्हाल थक्क
यंदाच्या वर्षी पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या कलाकार आहेत तरी कोण**?…** सर्वोत्कृष्ट चित्रपट: नोमेडलँड सर्वोत्कृष्ट अभिनेते - अँथनी हॉपकिंस (चित्रपट - द फादर) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : फ्रान्सेस मॅकडॉर्मंड (नोमाडलँड) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: डॅनियेल कालूया (चित्रपट - ‘जुडास एंड द ब्लैक मसीहा) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : युन यू जंग (चित्रपट – मिनारी) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: क्लोई झाओ (चित्रपट – नोमेडलँड) ‘सोल’ सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड मूव्ही बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट सब्जेक्ट: कोलेत बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर : माय ऑक्टोपस टीचर सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - ‘इफ एनीथिंग हॅपन्स आय लव्ह यू बेस्ट साऊंड - साऊंड ऑफ मेटल सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म - टू डिस्टेंस स्ट्रेंजर (ट्रॅव्हन फ्री आणि मार्टिन डेसमंड रो) सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार - अॅन रॉथ (चित्रपट - ‘मा रेनीज ब्लॅक बॉटम)