मुंबई 26 एप्रिल: ऑस्कर (Oscars 2021) हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. ऑस्करच्या सोनेरी ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या व्यक्तीला जगातील सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या पंक्तित स्थान मिळतं. त्यामुळंच सिनेसृष्टीत काम करणारा प्रत्येक कलाकार ऑस्कर जिंकण्याची इच्छा मनात बाळगत असतो. परंतु प्रश्न असा की ऑस्कर जिंकणाऱ्या कलाकाराला ट्रॉफी व्यतीरिक्त किती रुपयांचं बक्षिस मिळतं? (Do Oscar nominees get anything?) जर पुरस्कार सर्वोच्च असेल तर बक्षिसही तितकंच मोठं असणार असा आपल्या सर्वांचा समज आहे. परंतु सत्य पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल...
ऑस्कर जिंकणाऱ्या कलाकाराला सोनं आणि ब्रिटेनिअमपासून तयार केलेली एक ट्रॉफी मिळते. या ट्रॉफीची किंमत जवळपास 70 हजार रुपये इतकी असते. शिवाय एक प्रशस्तीपत्रक मिळतं. या व्यतिरिक्त 2,500 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास 18 लाख रुपयांचं एक गिफ्ट वाऊचर मिळतं. सिनेमाब्लेंडनं दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी या वाऊचरची किंमत कमी अधिक केली जाते. गेल्या तीन वर्षांपासून नामांकन मिळालेल्या कलाकारांनाही हे वाऊचर देऊन सन्मानित केलं जात आहे. म्हणजे थोडक्यात काय तर पुरस्कार जिंकणाऱ्या कलाकारांना ऑस्करतर्फे फारसा आर्थिक लाभ मिळत नाही. पण ऑस्करतर्फे आर्थिक लाभ मिळाला नसला, तरी विजेत्यांना प्रतिष्ठा मात्र प्रचंड मिळते. अन् या प्रतिष्ठेच्या जोरावर त्यांना अनेक मोठे प्रोजेक्ट मिळतात. अन् या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यांना आर्थिक लाभ मिळवता येतो.
अवश्य पाहा - सलमान खाननं 5 हजार लोकांना केलं अन्न वाटप; युवा सेनेनं मानले भाईजानचे आभार
यंदाच्या वर्षी पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या कलाकार आहेत तरी कोण?...
सर्वोत्कृष्ट चित्रपट: नोमेडलँड
सर्वोत्कृष्ट अभिनेते - अँथनी हॉपकिंस (चित्रपट - द फादर)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : फ्रान्सेस मॅकडॉर्मंड (नोमाडलँड)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: डॅनियेल कालूया (चित्रपट - 'जुडास एंड द ब्लैक मसीहा)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : युन यू जंग (चित्रपट – मिनारी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: क्लोई झाओ (चित्रपट – नोमेडलँड)
'सोल' सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड मूव्ही
बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट सब्जेक्ट: कोलेत
बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर : माय ऑक्टोपस टीचर
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - 'इफ एनीथिंग हॅपन्स आय लव्ह यू
बेस्ट साऊंड - साऊंड ऑफ मेटल
सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म - टू डिस्टेंस स्ट्रेंजर (ट्रॅव्हन फ्री आणि मार्टिन डेसमंड रो)
सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार - अॅन रॉथ (चित्रपट - 'मा रेनीज ब्लॅक बॉटम)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Oscar, Oscar award