मुंबई, 27 मार्च : भारतीय चित्रपटसृष्टींमध्ये ज्या पुरस्कार सोहळ्यांची आतुरतेने वाट पाहिली जाते, त्यामधला एक म्हणजे फिल्म फेअर. 66th Filmfare Awards 2021 ची घोषणा शनिवारी करण्यात आली. कोविड काळात फक्त OTT प्लॅटफॉर्मवर रीलिज झालेल्या ‘गुलाबो सिताबो’ने परीक्षकांची मनं जिंकली असल्याचं आतापर्यंत घोषित झालेल्या पुरस्कारावरून दिसतं. अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांच्या जुगलबंदीने रंगलेल्या संवादांना बेस्ट डायलॉग्जचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय कानपूरचं दर्शन घडवणाऱ्या या सिनेमाला बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कारही मिळाला आहे. बेस्ट कॉस्च्युम्सचा पुरस्कारही याच सिनेमाने खिशात घातला. हे वाचा - क्रिती सेननने पोस्ट केला हाय स्लिट ड्रेसमधला फोटो;बिग बींनी अशी दिली प्रतिक्रिया बेस्ट डायलॉग - जुही चतुर्वेदी (गुलाबो सिताबो) बेस्ट एडिटिंग - थप्पड बेस्ट बॅकग्राउंड स्कोअर - थप्पड बेस्ट पार्श्वगायक - राघव चैतन्य (थप्पड) बेस्ट पार्श्वगायिका- आसीस कौर (मलंग) बेस्ट अॅक्शन - रमजान बुलुट, आरपी यादव (तान्हाजी : द अनसंग वॉरियर) बेस्ट म्युझिक अल्बम- ल्युडो बेस्ट वीएफएक्स - प्रसाद सुतार (तान्हाजीः द अनसंग वॉरियर) बेस्ट कॉस्ट्युम डिझाइन - वीरा कपूर ईई (गुलाबो सिताबो) बेस्ट साउंड डिझाइन - कामोद खाराडे (थप्पड) बेस्ट प्रॉडक्शन डिझाइन - मानसी ध्रुव मेहता (गुलाबो सिताबो) बेस्ट बॅकग्राउंड स्कोर - मंगेश उर्मिला धाकडे (थप्पड)