जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / क्रिती सेननने पोस्ट केला हाय स्लिट ड्रेसमधला फोटो; बिग बींनी अशी दिली प्रतिक्रिया

क्रिती सेननने पोस्ट केला हाय स्लिट ड्रेसमधला फोटो; बिग बींनी अशी दिली प्रतिक्रिया

क्रिती सेननने पोस्ट केला हाय स्लिट ड्रेसमधला फोटो; बिग बींनी अशी दिली प्रतिक्रिया

क्रितीने अलीकडेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो (Photo) शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून अमिताभ बच्चन यांनीही कमेंट केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 मार्च: बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवल्यानंतर काही काळातच आपल्या अभिनयाने दर्शकांना मोहिनी घालणाऱ्या क्रिती सेनननं (Kriti Sanon) एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत असून तिचा हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून अमिताभ बच्चन यांनीही कमेंट केली आहे. त्यांनी क्रितीच्या या फोटोवर प्रतिक्रिया दिली (Amitabh Bachchan Comment on Kriti Sanon hot photo) असून त्यांची ही प्रतिक्रियाही व्हायरल होतं आहे. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो अपलोड केला आहे. ज्यात तिने डीप नेक, हाय स्लिट मॅक्सी ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करताना क्रितीने लिहिलं की, ‘सालसा एनिवन.’ तिच्या या फोटोला असंख्य चाहत्यांसोबत बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी क्रितीच्या सौदर्यांचं भरभरून कौतुक केलं आहे.

जाहिरात

यावेळी महानायक अमिताभ बच्चन यांनीही क्रितीच्या फोटोवर ‘Wow’ अशी कमेंट केली आहे. सोबतचं लाल रंगाच्या लव्हचा इमोजीही कमेंट केला आहे. आता अमिताभ यांची ही कमेंट वेगाने व्हायरल होतं आहे. तसंच अनेक चाहत्यांनी अमिताभ यांच्या कमेंट्सवरही प्रतिक्रिया दिल्या आहेत. (वाचा - बिग बींसोबत काम केलेली ही तरुणी झाली बेरोजगार; मोमोज विकून काढतेय दिवस ) क्रिती सेनन सध्या अरुणाचल प्रदेशात असून तिच्या आगामी ‘भेडिया’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात ती बॉलीवूड अभिनेता वरुण धवनसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याचबरोबर दक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या आदीपुरुषमध्ये ती दिसणार आहे. या चित्रपटात क्रिती सीतेची भूमिका साकारताना दिसणार आहे. हे दोन्ही चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित केले जाणार आहेत. तर दुसरीकडे अमिताभ बच्चन ब्रह्मास्त्र, चेहरे, झुंड यांसारख्या बहुचर्चित चित्रपटात दिसणार आहेत. झुंड हा चित्रपट नागराज मंजुळे दिग्दर्शित करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात