JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / मी मेलेल्या माणसाला जिवंत करू शकते! 5 तास चालला तमाशा, शेवटी...

मी मेलेल्या माणसाला जिवंत करू शकते! 5 तास चालला तमाशा, शेवटी...

आपली मुलगी पुन्हा जिवंत होईल, या भाबड्या आशेनं हे कुटुंब अंधश्रद्धेला बळी पडलं. आणि…

जाहिरात

मृतदेहाभोवती फिरत ती मंत्रोच्चार करत होती. तब्बल 5-6 तास हा तमाशा सुरू होता.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अभिषेक उपाध्याय, प्रतिनिधी आझमगड, 18 जून : आपण 2023मध्ये जगत असतानाही लोक अंधश्रद्धेला सहज बळी पडतात. उत्तर प्रदेश राज्यातील आझमगडमध्ये तर चक्क मृत व्यक्तीला जिवंत करण्याच्या नादात तब्बल 5 तास मंत्रोच्चार करण्यात आला. याप्रकरणी मृताच्या नातेवाईकांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या दोघींना पोलिसांना तुरुंगात धाडलं आहे. अवांव गावात ही विचित्र घटना घडली. सर्पदंशाने मृत्यू झालेल्या तरुणीवर तिचे नातेवाईक अंत्यसंस्कार करण्यासाठी जात असतानाच हा प्रकार घडला. आपली मुलगी पुन्हा जिवंत होईल, या भाबड्या आशेनं हे कुटुंब अंधश्रद्धेला बळी पडलं.

मिळालेल्या माहितीनुसार, गीता राजभर या तरुणीला साप चावल्याने तिचे कुटुंबियांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. विष तिच्या पूर्ण शरीरभर पसरलं आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्यानंतर कुटुंबियांनी रुग्णालयातच हंबरडा फोडला. थोड्या वेळाने ते मृतदेह घरी घेऊन गेले. कोणताही आजार नसताना आपली मुलगी अचानक वारली, याचा कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. ते तिच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेले असतानाच वाटेत त्यांना एक तरुणी भेटली. तिने त्यांना थांबवलं आणि मी मेलेल्या माणसाला जिवंत करू शकते, असं सांगितलं. हे ऐकून गीताचे कुटुंबीय अक्षरश: विरघळले. पुढचा मागचा विचार न करता त्यांनी मृतदेह तिच्या स्वाधीन केला. Mumbai Crime : कर्जाचा डोंगर कमी करायला गेला अन् थेट तुरुंगात पोहचला; आरोपीला गुजरातमधून अटक त्यानंतर तरुणीने एका प्राथमिक शाळेत हा मृतदेह ठेवून त्याच्याभोवती रिंगण आखलं. या रिंगणाभोवती फिरत-फिरत ती मंत्रोच्चार करत होती. तब्बल 5-6 तास हा तमाशा सुरू होता. याबाबत पोलिसांना कुणकुण लागताच ते ताबडतोब त्याठिकाणी हजर झाले आणि सर्वांना जागच्या जागी थांबायला सांगितलं. पोलिसांनी सर्वात आधी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर मृतदेह जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या तरुणीला ताब्यात घेतलं. शेजारच्याच अश्वना गावात राहणाऱ्या या गोबरी आणि तिच्या मुलीला समाजात अंधश्रद्धा पसरविण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या