जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Mumbai Crime : कर्जाचा डोंगर कमी करायला गेला अन् थेट तुरुंगात पोहचला; आरोपीला गुजरातमधून अटक

Mumbai Crime : कर्जाचा डोंगर कमी करायला गेला अन् थेट तुरुंगात पोहचला; आरोपीला गुजरातमधून अटक

आरोपीला गुजरातमधून अटक

आरोपीला गुजरातमधून अटक

Mumbai Crime : लॉकडाऊनमध्ये झालेला कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी मजुराने मालकाच्या दुकानातच मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई, 18 जून : कर्ज फेडण्यासाठी कामगारानेच सोन्याच्या कारखान्यातून सोन्याचा रॉड चोरल्याची घटना घडली. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी आरोपीला गुजरातमधून अटक केली आहे. कांदिवली पोलिसांनी 24 तासांत सुरत येथून आरोपीला अटक केली. आरोपींकडून चोरीला गेलेला 216 ग्रॅम सोन्याचा रॉड जप्त करण्यात आला आहे. ज्याची किंमत सुमारे 8 लाख 65 हजार रुपये आहे. हनीफ अन्सार मलिक असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. लॉकडाऊनमध्ये कामात तोटा झाल्याने कर्ज वाढले होते. यामुळे त्याने ही चोरी केल्याचे त्याने पोलीस चौकशीत सांगितले. कर्ज झाल्याने केला गुन्हा फिर्यादी यांचा कांदिवली पश्चिमेला सोन्याचे दागिने बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात पश्चिम बंगालचे रहिवासी असलेले 4 ते 5 कामगार काम करतात. आरोपीही याच कारखान्यात काम करत होता. लॉकडाऊनच्या काळात आरोपीच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला होता. हे कर्ज कसं फेडायचं या विवंचनेत आरोपी होता. याचवेळी त्याच्या मनात चोरीचा विचार आला. गुजरातमधून अटक आरोपीने आधी मालकाचा विश्वास संपादन केला, मग मालकाने सोन्याचे दागिने बनवण्यासाठी दिलेला 216 ग्रॅम वजनाचा रॉड चोरुन पोबारा केला. आरोपी सोने चोरुन पळाल्याचे लक्षात येताच मालकाने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गिते, सपोनि सोहम कदम, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित भिसे यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. यावेळी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी गुजरातला जाणार असल्याची माहिती मिळाली. वाचा - ‘मला बळजबरीने…’ 8 वर्षांच्या मुलीची खोटी तक्रार, फूड डिलिव्हरी बॉयला मारहाण मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचे पथक गुजरातला रवाना झाले. तांत्रिक तपास करता आरोपी सूरत येथील एका इमारतीत लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीविरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 381 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात