नवी दिल्ली 18 जानेवारी : देशात कोरोना रुग्णसंख्येत (Corona Cases in India) घट होताना दिसत असल्याने तिसरी लाट (Third Wave of Coronavirus) ओसरत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशात आता हा सवाल उपस्थित केला जात आहे, की जानेवारीच्या अखेरीस कोरोना रुग्णसंख्या उच्चांक गाठेल (Third Wave Peak in India), असा विशेषतज्ञांनी लावलेला अंदाज चुकीचा होता का? मात्र, नवीन अभ्यासानुसार, भारतात 23 जानेवारीला कोरोनाची प्रकरणं शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. याकाळात देशात दिवसाला 7 लाखाहून अधिक रुग्ण नोंदवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतात कोरोनाचे एका दिवसात नवीन 2,58,089 रुग्ण समोर आल्यानंतर देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून 3,73,80,253 झाली आहे. एकूण कोरोनाबाधितांमधील 8,209 रुग्ण कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सोमवारी सकाळी आठ वाजता जारी करण्यात आलेल्या अपडेट आकडेवारीनुसार, देशातील 29 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या ओमाक्रॉन व्हेरिएंटची 8,209 प्रकरणं आढळून आली आहेत. यातील 3,109 लोक कोरोनामुक्त झाले आहेत किंवा इतर ठिकाणी निघून गेले आहेत. कोरोना विषाणूवर प्रभावी असलेल्या हिमालयीन वनस्पती शोध आकडेवारीनुसार, संसर्गाचा दैनिक दर 19.65 टक्के आणि साप्ताहिक दर 14.41 टक्के नोंदवला गेला आहे. देशात आतापर्यंत तब्बल 3,52,37,461 लोक कोरोनामुक्त झाले आहेत आणि कोरोनाबाधितांचा मृत्यूदर 1.30 टक्के आहे. तर कोरोनातून बरं होणाऱ्यांचा दर 94.27 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की ओमायक्रॉनची महाराष्ट्रात सर्वाधिक 1,738 प्रकरणं समोर आली आहेत. यानंतर पश्चिम बंगाल, राजस्थान, दिल्ली, कर्नाटक आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे. आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मणीन्द्र अग्रवाल यांनी सांगितलं, की फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत भारतातील कोरोनाची तिसरी लाट जवळपास संपेल. आयआयटी कानपूरच्या सूत्र मॉडलनुसार, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची लाट उच्चांक गाठेल. Omicron नैसर्गिक लसीप्रमाणे काम करत असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा! काय आहे तथ्य? याबाबत बोलताना एक्सपर्ट आणि आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मणीन्द्र अग्रवाल म्हणाले, की देशातील मेट्रो सिटीबाबत सूत्र मॉडलचा केलेला अभ्यास बरोबर नाही. याबाबत बोलताना ते म्हणाले, की कोरोना टेस्टबाबत आलेल्या नव्या गाईडलाईन्समुळे टेस्टची संख्या कमी झाली आहे, यामुळे रुग्णसंख्या कमी येत आहे. उदाहरण म्हणून पाहायचं झाल्यास दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट १५ ते १६ जानेवारीला उच्चांकावर असेल, असे सांगण्यात येत होतं. गणितीय मॉडलनुसार, या काळात दररोज ४५ हजार नवे रुग्ण समोर येणार होते. मात्र, या काळात प्रत्यक्षात हा आकडा २८ हजाराच्या जवळपास राहिला. मुंबईतही १२ जानेवारीला कोरोनाची रुग्णसंख्या उच्चांक गाठेल असं सांगण्यात येत होतं. कोरोना प्रकरणांबद्दलचा हा अंदाज 72 टक्क्यांपर्यंत बरोबर आल्याचं चित्र आहे.