Home /News /coronavirus-latest-news /

Buransh | भारतीय शास्त्रज्ञांची कमाल! कोरोना विषाणूवर प्रभावी असलेल्या हिमालयीन वनस्पती शोध

Buransh | भारतीय शास्त्रज्ञांची कमाल! कोरोना विषाणूवर प्रभावी असलेल्या हिमालयीन वनस्पती शोध

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-मंडी (IIT-Mandi) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी-नवी दिल्ली (ICGEB) या संस्थांतल्या संशोधकांनी कोरोना संसर्गावर नवीन संशोधन केलं आहे.

    मंडी, 17 जानेवारी : हिमालयीन बुरांश (Buransh) या वनस्पतीच्या फुलांच्या पाकळ्यांमध्ये आढळणारी फायटोकेमिकल्स (Phytochemicals) कोरोना विषाणूच्या संसर्गावर (Coronavirus) उपचार करण्यासाठी वापरली जाऊ शकतात, असं दिसून आलं आहे. ऱ्होडोडेंड्रॉन आर्बोरियम (Rhododendron arboreum) असं या वनस्पतीचं शास्त्रीय नाव आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-मंडी (IIT-Mandi) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी-नवी दिल्ली (ICGEB) या संस्थांतल्या संशोधकांनी यावर संशोधन केलं आहे. 'आयआयटी-मंडी'चे डॉ. श्यामकुमार मसाकापल्ली आणि डॉ. रंजन नंदा आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी या संस्थेच्या (ICGEB) डॉ. सुजाता सुनील यांच्या नेतृत्वाखालच्या संशोधन पथकाने काढलेले निष्कर्ष नुकतेच ‘बायोमॉलिक्युलर स्ट्रक्चर अँड डायनॅमिक्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. बुरांशच्या पाकळ्यांमधून विशिष्ट फायटोकेमिकल्सद्वारे कोरोना विषाणूला केल्या जाणाऱ्या प्रतिबंधाची अचूक प्रक्रिया समजून घेण्यासाठी हे संशोधक यावर आणखी संशोधन करणार आहेत. या पाकळ्या गरम पाण्यात घालून काढलेल्या त्याच्या अर्कामध्ये क्विनिक अॅसिड (Quinic Acid) आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह भरपूर प्रमाणात आढळून आले. त्याच्या रेण्वीय (Molecular Dynamics) अभ्यासातून असं आढळून आलं आहे, की या वनस्पतींच्या पाकळ्यांमधली (Petals) फायटोकेमिकल्स विषाणूविरुद्ध दोन प्रकारे कार्य करतात. ते मुख्य प्रोटीज म्हणजे विषाणूंची शरीरात संख्या वाढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी एन्झाइम्स आणि पेशींमध्ये विषाणूच्या प्रवेशाला मदत करणाऱ्या मानवी शरीरातल्या अँजिओटेन्सिन-कन्व्हर्टिंग एन्झाइम-2 (ACE2) यांच्याशी संबधित प्रक्रियेवर प्रभाव टाकतात. कुठेही जाण्यासाठी Vaccine Pass बंधनकारक, लसीकरण विरोधकांना ‘फ्रेंच’ दणका या फुलांच्या पाकळ्यांच्या अर्काचा डोस व्हेरो E6 पेशींमध्ये (Vero E6 cells) कोविड संसर्गास प्रतिबंध करू शकतो. व्हेरो E6 पेशी या आफ्रिकेतल्या हिरव्या माकडाच्या मूत्रपिंडापासून तयार केलेल्या पेशी असतात. त्याचा वापर सामान्यतः विषाणू आणि जीवाणू संसर्गाचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. त्याचा पेशींवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, असंही या संशोधनात स्पष्ट झालं आहे. स्थानिक नागरिक या बुरांश वनस्पतीचा वेगवेगळ्या पद्धतीनं उत्तम आरोग्यासाठी वापर करतात. आयआयटी मंडी आणि ICGEBमधील संशोधकांनी विषाणूवर याचा काय परिणाम होतो, यावर लक्ष केंद्रित करून त्यातली विविध प्रकारची फायटोकेमिकल्स असलेल्या अर्कांची वैज्ञानिकदृष्ट्या चाचणी केली. संशोधकांनी बुरांशच्या पाकळ्यांमधून फायटोकेमिकल्स काढले आणि त्याचे (अँटीव्हायरल) विषाणूविरोधी गुणधर्म समजून घेण्यासाठी बायोकेमिकल आणि कम्प्युटेशनल सिम्युलेशनचा अभ्यास केला. याबाबत अधिक माहिती देताना आयआयटी-मंडीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. श्याम कुमार मसाकापल्ली म्हणाले, की ' विषाणूवर मात करू शकतील अशी औषधं, उपचार-पद्धती शोधण्याचं काम जगभरात सुरू आहे. यात फायटोकेमिकल्स म्हणजे वनस्पतींपासून मिळवलेली रसायनं त्यांच्या गुणकारी वैशिष्ट्यांमुळे आणि नैसर्गिक स्रोत असल्यानं विषारी नसल्यानं महत्त्वाची मानली जातात. आम्ही या हिमालयीन वनस्पतींमधून असे गुणकारी रेणू शोधत आहोत, जे विषाणूवर मात करू शकतील.' काय म्हणावं याला! म्हणे, 'मला हवी कोरोना पॉझिटिव्ह तरुणी', पैसे देण्याचीही तयारी ICGEB च्या ट्रान्सलेशनल हेल्थ ग्रुपचे डॉ. रंजन नंदा यांनी सांगितलं, ‘आम्ही हिमालयीन वनस्पतीच्या पाकळ्यांमधल्या फायटोकेमिकल्सची चाचणी केली असून, ते कोविड विषाणूविरुद्ध प्रभावी ठरत असल्याचं आढळलं आहे. ही फार आशादायी बाब आहे.' ICGEB मधल्या व्हेक्टर-बोर्न डिसीज ग्रुपच्या डॉ. सुजाता सुनील यांनी सांगितलं, 'फायटोकेमिकल प्रोफायलिंग, कम्प्युटर सिम्युलेशन आणि इन-व्हिट्रो अँटिव्हायरल अॅसेसच्या संयुक्त अभ्यासातून असं आढळून आलं आहे, की बुरांशच्या पाकळ्यांतला अर्क डोस कोविड-19 विषाणूच्या वाढीला रोखतो. या संशोधनासाठी डॉ. मनीष लिंगवन, शगुन शगुन, फलक पाहवा, अंकित कुमार, दिलीप कुमार वर्मा, योगेश पंत, लिंगराव व्ही. के. कामतम आणि बंदना कुमारी यांनीही सहकार्य केलं आहे. या संशोधन प्रबंधाच्या लेखनात त्यांचाही सहभाग आहे.
    First published:

    Tags: Coronavirus, Covid-19

    पुढील बातम्या