मुंबई, 25 डिसेंबर : भारतात लहान मुलांच्या कोरोना लसीकरणासह बुस्टर डोसचाही (Corona vaccine booster dose in india) मार्ग मोकळा झाला आहे. देशात आता कोरोना लशीचा बुस्टर डोसही दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi live) यांनी ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे कोरोना लशीच्या दोन डोससह आता तिसरा डोसही दिला जाईल. काही देशांमध्ये कोरोना लशीचा बुस्टर डोस दिला जातो आहे. भारतात याची फक्त चर्चा होत होती. अखेर आता भारतातही बुस्टर डोस मिळणार हे पक्कं झालं आहे. काही विशिष्ट लोकांनाच बुस्टर डोस देणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोना योद्धा, हेल्थकेअर आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांचं कोरोना लढाीत देशाला सुरक्षित ठेवण्यात खूप मोठं योगदान आहे. आजही ते कोरोना रुग्णांच्या सेवेत आपला वेळ देत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून सरकारने त्यांना प्रिकॉशन डोस (Precaution Dose) देण्याचा निर्णय सरकारने केला आहे. 10 जानेवारी, 2022 सोमवारपासून बुस्टर डोस द्यायला सुरुवात केली जाणार आहे. हे वाचा - लॉकडाऊन पुन्हा लागणार का? पंतप्रधान मोदींनी केल्या 2 महत्त्वाच्या घोषणा 60 वर्षांपेक्षा वरील नागरिक ज्यांना इतर आजार आहेत, त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रिकॉशन डोस देण्याचा पर्याय उपलब्ध असेल असंही मोदींनी सांगितलं. लहान मुलांनाही मिळणार लस आतापर्यंत आपल्याकडे 18 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीला लस घेण्यास परवानगी होती. पण, आता यापुढे 15 वर्षांपासून मुलांना लस घेता येणार आहे. पुढील महिन्यात 3 तारखेपासून लसीकरण सुरू होणार आहे, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली. हे वाचा - आता लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस; ‘भारत बायोटेक’ला मिळाला हिरवा कंदील ‘देशात लवकरच नाकाने लस देण्याची पद्धत सुरू होणार आहे. याचे काम सुरू आहे. गेल्या 12 महिन्यांपासून देशात लसीकरण अभियान सुरू आहे. सर्वसामान्याचं आयुष्य आता सुरळीत होत आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारली आहे. पण, कोरोना अजून गेला नाही. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला सतत काम करायचे आहे, असं आवाहनही मोदींनी केलं.