Home /News /mumbai /

लॉकडाऊन पुन्हा लागणार का? पंतप्रधान मोदींनी केल्या 2 महत्त्वाच्या घोषणा

लॉकडाऊन पुन्हा लागणार का? पंतप्रधान मोदींनी केल्या 2 महत्त्वाच्या घोषणा

सर्वसामान्याचं आयुष्य आता सुरळीत होत आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारली आहे. पण, कोरोना अजून गेला नाही

    मुंबई, 26 डिसेंबर : 'कोरोनाचे नवे व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron ) देशात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात रात्रीचे निर्बंध लावण्यात आले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi) यांनी जनतेशी संवाद साधून कोरोनाचे संकट अजून टळले नाही, कोरोनाच्या नियमांचे पालन करा, असं स्पष्ट बजावले आहे. तसंच, १५ वर्षांपर्यंत मुलं आणि डॉक्टरांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. (pm narendra modi speech) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  जनतेशी संवाद साधून कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. यावेळी पंतप्रधानांनी आरोग्य सेवक, डॉक्टर्स तसंच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. 'कोरोनाचे संकट अजून टळले नाही. आता ओमायक्रॉनचे नवे संकट आपल्यासमोर येऊन उभे ठाकले आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळा, मास्क वापरा. कोरोनाचे आलेले संकट आपल्याला पुन्हा एकदा टाळायचे आहे. ओमायक्रॉनच्या संकटामुळे पॅनिक होऊ नका पण सतर्क राहा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 'ओमायक्रॉन जगभरात पसरत आहे. आपले भारतीय संशोधक त्यावर नजर ठेवून आले. आतापर्यंत आपल्याकडे 18 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीला लस घेण्यास परवानगी होती. पण, आता यापुढे १५ वर्षांपासून मुलांना लस घेता येणरा आहे. पुढील महिन्यात ३ तारखेपासून लसीकरण सुरू होणार आहे, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली. देशात कोरोनाचे संकट आले, त्याला रोखण्यासाठी आपण लसीकरण सुरू केले. मागील वर्षी १६ जानेवारीपासून आपण नागरिकांना लसीकरण सुरू केले होते. देशातील नागरिकांनी या अभियानाला साथ दिली. त्यामुळे भारतात 141 कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे अभूतपूर्व आणि अवघड असे लक्ष पार केले, अजूनही देशभरात लसीकरण वेगाने सुरू आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. देशात लवकरच नाकाने लस देण्याची पद्धत सुरू होणार आहे. याचे काम सुरू आहे. गेल्या १२ महिन्यांपासून देशात लसीकरण अभियान सुरू आहे. सर्वसामान्याचं आयुष्य आता सुरळीत होत आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारली आहे. पण, कोरोना अजून गेला नाही. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला सतत काम करायचे आहे, असं आवाहनही मोदींनी केलं. देशात लवकरच नाकाने लस देण्याची पद्धत सुरू होणार आहे. याचे काम सुरू आहे. गेल्या १२ महिन्यांपासून देशात लसीकरण अभियान सुरू आहे. सर्वसामान्याचं आयुष्य आता सुरळीत होत आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारली आहे. पण, कोरोना अजून गेला नाही. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला सतत काम करायचे आहे, असं आवाहनही मोदींनी केलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Narendra modi

    पुढील बातम्या