जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Breaking! लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस; Bharat Biotech ला DGCI कडून हिरवा कंदील

Breaking! लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस; Bharat Biotech ला DGCI कडून हिरवा कंदील

Breaking! लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस; Bharat Biotech ला DGCI कडून हिरवा कंदील

Children corona vaccination : लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा. भारत बायोटेकच्या (Bhart biotech) कोवॅक्सिन (Covaxin) कोरोना लशीला मंजुरी.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 डिसेंबर : भारतातील लहान मुलांच्या लसीकरणाचा (Children corona vaccination) मार्ग मोकळा झाला आहे. आता लहान मुलांनाही कोरोना लस मिळणार आहे. भारत बायोटेकची लस लहान मुलांना देण्यासाठी मोदी सरकारने परवानगी दिली आहे. ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने (Drugs Controller General of India) लहान मुलांसाठी भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) लशीला हिरवा कंदील दिला आहे. हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस ही सध्या देशात दिली जात आहे. सध्या 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं लसीकरण होतं आहे. लहान मुलांनाही लवकरात लवकर लस मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यासाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीची लहान मुलांवर चाचणी सुरू करण्यात आली. आता ही लस लहान मुलांना देण्यास परवानगी देण्यात आली आहे. 12 ते 18 वयोगटातील मुलांवर  या लशीच्या आपात्कालीन वापराला डीजीसीआयने (DGCI) परवानगी दिली आहे. मेदांताचे मॅनेजिंग डायरेक्टर नरेश त्रेहान म्हणाले, ओमिक्रॉन वेगाने पसरतो आहे. त्यामुळे लहान मुलांनाही कोरोना लस दिली जाणार हा खूप मोठा दिलासा आहे. हे वाचा -  कोरोनामुळे भयंकर अवस्था; तरी Lung transplant शिवायच शौर्यने जिंकला आयुष्याचा लढा कोव्हॅक्सिन ही भारत बायोटेक (Bharat Biotech), आयसीएमआर (ICMR) आणि एनआयव्ही (NIV) या संस्थांनी पूर्णतः भारतातच तयार केलेली लस आहे. ही लस पारंपरिक इनअॅक्टिव्हेटेड प्लॅटफॉर्मवर (Inactivated Platform) तयार करण्यात आली आहे. म्हणजेच यातून मृत व्हायरस शरीरात सोडला जातो. त्यातून अँटीबॉडी प्रतिसादाला चालना मिळते. विषाणू ओळखून त्याला विरोध करण्यासाठी अँटीबॉडी तयार केल्या जातात. कोव्हॅक्सिन लशीचे दोन डोस चार ते सहा आठवड्यांच्या अंतराने घ्यावे लागतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात