नवी दिल्ली14 जानेवारी : तमिळनाडूमध्ये नाईट कर्फ्यू (Night Curfew) आणि रविवारी लॉकडाऊन (Sunday Lockdown) या घोषणेनंतर शनिवारी लोकांनी महत्त्वाचं सामान घेण्यासाठी एकच गर्दी केली. लोकांनी एकाच दिवसात इतकी दारू विकत घेतली, की एकाच दिवसात 210 कोटी रुपयांच्या दारू विक्रीचा रेकॉर्डच बनला. ही रेकॉर्ड विक्री कांचीपुरम, चेंगलपत्तु आणि तिरुवल्लुवर जिल्ह्यांमध्येच 25 टक्के झाली आहे. या तीन जिल्ह्यातील लोकांनी एकाच दिवसात 52 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची दारू खरेदी केली. तब्बल 2 हजार 497 पोलिसांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, 24 तासांत 403 जणांना लागण देशात कोरोना रुग्णांची (Corona Cases in India) संख्या झपाट्याने वाढत असल्याने देशभरात लॉकडाऊन होणार असल्याची बातमीही चर्चेत आहे. देशात मे 2021 नंतर आतापर्यंत सर्वाधिक अडीच लाख कोरोना रुग्ण नोंदवले गेले आहेत. अशात देशातील अनेक राज्यांमध्ये निर्बंध कडक केले जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये लोकांना ही भीती आहे, की नाईट कर्फ्यूनंतर सरकार लॉकडाऊनची घोषणाही करू शकतं. याच कारणामुळे लोक महत्त्वाच्या गोष्टी जमा करून ठेवत आहेत. यात बिस्किट, मॅगी, पॅकेज्ड फूड, कुकींग ऑईल, मास्क-सॅनिटायझर, डेअरी प्रोडक्ट्स यांसारख्या वस्तू आहेत. अनेक राज्यांमध्ये लोकांनी दारूची रेकॉर्ड खरेदी केली आहे. Omicron संदर्भात जीनोम सिक्वेन्सिंगची रणनिती बदलणार! तमिळनाडूमध्ये करण्यात आलेल्या नाईट कर्फ्यू आणि रविवारच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर लोकांनी शनिवारी महत्त्वाचं सामान खरेदी करून ठेवायला सुरुवात केली आहे. राज्यात एका दिवसात 210 कोटी रुपयांच्या दारू विक्रीचा रेकॉर्ड बनला आहे. पारले प्रोडक्ट्सच्या माहितीनुसार, 27 डिसेंबर ते 2 जानेवारी या काळात पारलेची विक्री 15 टक्क्यांनी वाढली आहे.