मुंबई, 29 नोव्हेंबर : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रोन (Omicron) या कोरोनाच्या नवीन प्रकाराने पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग इतर देशांमध्ये सतत पसरताना दिसत आहे. तज्ज्ञांचा असा दावा आहे की हा प्रकार भारतातील दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार असलेल्या डेल्टा प्रकारापेक्षा अधिक संसर्गजन्य असू शकतो. कोरोना विषाणूचे नवीन रूप B.1.1.529 (Omicron) जगासमोर एक नवीन समस्या बनली आहे. डब्ल्यूएचओने याबद्दल चिंता व्यक्त केली असून “चिंतेचे प्रकार” (Variant of concern) म्हणून सूचीबद्ध केले आहे. जगभरातील तज्ञांचा दावा आहे की ओमिक्रॉन सारख्या धोकादायक प्रकारांवर मोनोक्लोनल अँटीबॉडी थेरपीचा कोणताही प्रभाव नाही. या प्रकारातील ताकद आणि वैशिष्ट्यांबाबत अनेक नवीन गोष्टीही समोर आल्या आहेत. ओमिक्रॉन प्रकार किती धोकादायक आहे? (How much contagious Omicron variant) दक्षिण आफ्रिकेसह इतर देशांमध्ये ओमिक्रॉन संसर्गाच्या प्राथमिक विश्लेषणावरुन डेल्टा प्रकारापेक्षा सहापट अधिक शक्तिशाली असे वर्णन केले जात आहे. डेल्टा हा तोच प्रकार आहे ज्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात कहर केला होता. हा प्रकार रोगप्रतिकारक शक्तीला देखील हुलकावणी देऊ शकतो. न्यू यॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, ओमिक्रॉन आधीच्या प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य असून लसीकरण किंवा नैसर्गिक संसर्गामुळे होणारी रोगप्रतिकारक प्रतिक्रिया देखील निष्क्रिय करू शकते. दक्षिण आफ्रिका व्हेरिएंटचे नाव Omicron का ठेवलं गेलं? याचा चीनशी काय संबंध? तज्ञांच्या मते, व्हायरसची आतापर्यंतची सर्वात जास्त म्यूटंट ओमिक्रॉनमध्ये दिसली आहे. एका विषाणूमध्ये इतके म्यूटेशन यापूर्वी कधीही दिसले नव्हते. त्यामुळेच शास्त्रज्ञांना या नव्या प्रकाराची चिंता सतावत आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की ओमिक्रॉन आधीच्या बीटा आणि डेल्टा प्रकारांपेक्षा अनुवांशिकदृष्ट्या भिन्न आहे, परंतु या अनुवांशिक बदलांमुळे ते अधिक धोकादायक आहे की नाही हे अद्याप माहित नाही. मोनोक्लोनल न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी थेरपी (Omicron variant vs Delta Variant) अधिक संसर्गजन्य असणाऱ्या डेल्टा प्रकारावर संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात मोनोक्लोनल अँटीबॉडी थेरपीचा प्रभाव असल्याचे दिसून आले आहे. मात्र, या थेरपीचा डेल्टा प्लस प्रकारावर कोणताही परिणाम होत दिसला नाही. आता डेल्टा प्लस प्रकारानंतर ओमिक्रॉन हा दुसरा असा प्रकार आहे, जो मोनोक्लोनल अँटीबॉडी उपचाराने प्रभावित होत नाही. चिंता वाढवणारी बातमी, भिवंडीत वृद्धाश्रमातील 69 वृद्धांना Corona ची लागण ओमिक्रॉन संसर्गाची लक्षणे काय आहेत? (Omicron variant symptoms) दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉन प्रकार ओळखणारे डॉक्टर अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितले की, ‘मी पहिल्यांदा त्याची लक्षणे सुमारे 30 वर्षांच्या तरुणामध्ये पाहिली.’ त्याने सांगितले की रुग्ण खूप थकला होता. हलक्या डोकेदुखीसह संपूर्ण शरीरात वेदना होत असल्याची त्यांची तक्रार होती. त्याला शिंका येण्यासारख्या समस्याही होत्या. त्याला खोकला, चव जाणे आणि वास कमी झाल्यासारखी कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. रुग्णांचा एक गट पाहिल्यानंतरच डॉक्टरांनी ही प्रतिक्रिया दिली होती. बहुतेक लोकांना त्याची लक्षणे कशी असतील याबद्दल त्यांनी कोणताही स्पष्ट दावा केलेला नाही. Omicronचा धोका वाढला; परदेशातून येणाऱ्यांसाठी बदलले नियम,जाणून घ्या नवी नियमावली डॉ. कोएत्झे यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना दक्षिण आफ्रिकेत कोविड-19 च्या नवीन प्रकाराची लागण झालेली व्यक्ती आढळली तेव्हा त्यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची तपासणी केली. दुर्दैवाने, कुटुंबातील सर्व सदस्य संसर्गाच्या विळख्यात होते. सर्व संक्रमितांमध्ये अतिशय सौम्य लक्षणे दिसून आली. डॉ कोएत्झे म्हणाले की, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, अशा रुग्णांवर घरीच उपचार करता येतात. ओमिक्रॉन संसर्ग या देशात आढळतोय दक्षिण आफ्रिकेत आढळणारा धोकादायक ओमिक्रॉन प्रकार आतापर्यंत अनेक देशांमध्ये पसरला आहे. शनिवारी जर्मनी, इटली, बेल्जियम, इस्रायल आणि हाँगकाँगमध्ये नवीन प्रकरणांची नोंद झाली. ब्रिटनमध्येही ओमिक्रॉनची दोन प्रकरणे समोर आल्यानंतर सरकारने मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि चाचणीबाबत कारवाई केली आहे. यूएसमधील सरकारचे सर्वोच्च संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. अँथनी फाउची म्हणाले की, ओमिक्रॉन प्रकाराची प्रकरणे यूएसमध्ये देखील दिसली तर आश्चर्य वाटणार नाही.