नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत (Coronavirus New Variant Omicron) जगभरात दहशतीचे वातावरण आहे. भारतातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे प्रवासी विशेषकरुन नवा व्हेरीएंट आढळलेल्या देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, WHO ने या प्रकाराला ओमिक्रॉन (Omicron) असे नाव दिलं आहे. मात्र, नव्या नामांकनाबाबत WHO वर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. याचं कारण नामकरण करताना काही अक्षर गाळली आहेत.
वास्तविक WHO ग्रीक वर्णमालेतील अक्षरांनुसार नवीन प्रकारांचे नामकरण करत असतात. ओमिक्रॉन हे ग्रीक वर्णमालेतील 15 वे अक्षर आहे. WHO ने या आधी आलेल्या 2 अक्षरांचे नाव कोणत्याही प्रकाराला दिलेले नाही. वगळलेल्या दोन अक्षरांची नावे Nu आणि Xi आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नावाशी साम्य असल्यामुळे Xi (शी) लेटर वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी, नवीन उच्चारांमुळे Nu वगळण्यात आला आहे. आतापर्यंत, WHO ने 13 प्रकारांचे ग्रीक अक्षरांनी नामकरण केलं आहे. म्हणून नावे दिली आहेत.
WHO वर विश्वास कसा ठेवायचा
यूके वृत्तपत्र द टेलिग्राफच्या मते, डब्ल्यूएचओच्या एका सूत्राने सांगितले की, चीनच्या राष्ट्रपतींच्या नावाशी साम्य असल्याने नवीन प्रकाराचे नाव Xi च्या लेटरवरून दिले गेले नाही. मात्र, याबाबत अमेरिकेचे खासदार टेड क्रुझ यांनी डब्ल्यूएचओच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. क्रुझ म्हणाले- जर WHO चिनी कम्युनिस्ट पक्षाला एवढी घाबरत असेल तर भयंकर महामारीच्या वेळी या आरोग्य संस्थेवर विश्वास कसा ठेवायचा.
If the WHO is this scared of the Chinese Communist Party, how can they be trusted to call them out the next time they're trying to cover up a catastrophic global pandemic? https://t.co/wURdLcdqw2
— Ted Cruz (@tedcruz) November 26, 2021
अरे देवा! भारतातही घुसला Omicron? South Africa हून आलेले 2 प्रवासी
डब्ल्यूएचओने शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूचा नवीन प्रकार B.1.1.529 चे नाव ओमिक्रॉन असं ठेवलं आहे. आरोग्य संस्थेने सांगितले की, सुरुवातीच्या तथ्यांच्या आधारे असे म्हणता येईल की महामारीचा हा स्ट्रेन खूप धोकादायक असू शकतो.
व्हेरिएंटमुळे भारत चिंतेत
विजेच्या वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनने संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं आहे. त्यामुळेच बहुतांश देशांनी दक्षिण आफ्रिकेतून प्रवास तात्काळ स्थगित केला आहे. खरं तर, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चेतावणी दिली होती की 'Omicron' इतर व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने पसरू शकतो आणि यामुळे पुन्हा संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर हे सावधगिरीचे उपाय केले गेले.
WHO च्या इशाऱ्यानंतर Omicron व्हेरिएंटमुळे भारत चिंतेत
'ओमिक्रॉन' हा प्रकार अनेक म्यूटेशनचा परिणाम असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. कोविड B.1.1.1.529 चे अधिक संसर्गजन्य स्वरूप पहिल्यांदा 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून WHO ला कळवण्यात आले. यानंतर बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग, इस्रायल आणि ब्रिटनमध्येही त्याची ओळख पटली आहे.
ज्या देशांनी दक्षिण आफ्रिकेतील प्रवाशांवर प्रवास निर्बंध लादले त्यात अमेरिका, कॅनडा, यूके यांचा समावेश आहे. अमेरिकेने सांगितलं की ते सोमवारपासून दक्षिण आफ्रिका आणि शेजारील देशांमधून प्रवास प्रतिबंधित करणार आहेत. ब्रिटन, युरोप आणि इतर देशांनी जाहीर केलेल्या उड्डाणांवर बंदी घातल्यानंतर कॅनडाने त्या देशांच्या सीमा देखील बंद करत असल्याचे सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.