JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Alert! तुम्हालाही रात्री होतोय का असा त्रास? हे Omicron symptoms आहे, बिलकुल दुर्लक्ष करू नका

Alert! तुम्हालाही रात्री होतोय का असा त्रास? हे Omicron symptoms आहे, बिलकुल दुर्लक्ष करू नका

Omicron night symptoms : ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांमध्ये एक नवं लक्षण डॉक्टरांना दिसून आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 डिसेंबर :  ओमिक्रॉनमुळे (Omicron) आता चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत (Omicron cases in india). आता काही रुग्णांचा बळीही गेला आहे (Omicron death). या जीवघेण्या ओमिक्रॉनची लक्षणं सौम्य आहेत (Omicron symptoms), काही प्रकरणात तर लक्षणंही दिसत नाहीत (Symptoms of Omicron). त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक आहे. अशात आता डॉक्टरांना ओमिक्रॉनचं एक नवीन लक्षण दिसून आलं हे लक्षण फक्त रात्रीच दिसून येतं (Omicron night symptoms). याबाबत डॉक्टरांनी अलर्ट केलं आहे. सामान्यपणे खोकला, श्वास घ्यायला त्रास, ताप अशी लक्षणं कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिसून येतात. पण कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटप्रमाणे त्याची लक्षणंही वेगळी आहेत. ओमिक्रॉनची लागण झाली असेल तर रात्री एक लक्षण दिसून येतं. ओमिक्रॉन कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांमध्ये ही समस्या दिसून आली आहे आणि हे लक्षण म्हणजे रात्री येणारा घाम. दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्या विभागातील डॉ. उनबेन पिल्ले  यांनी सांगितलं की, ओमिक्रॉन संसर्ग झालेल्या रुग्णांना रात्रीचा घाम येऊ शकतो. अनेकदा रुग्णाला इतका घाम येतो की त्याचे कपडे आणि अंथरूणही ओलं होऊ शकतं. अगदी थंड ठिकाणीही रुग्णांना घाम येईल. सोबतच रुग्णांच्या शरीरात वेदनाही होतील. हे वाचा -  Omicron च्या रुग्णाचा ब्रिटनमध्ये मृत्यू; एप्रिलपर्यंत 75000 जीव घेणार कोरोना? ओमिक्रॉन हा प्रकार प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला होता. ओमिक्रॉन प्रकार ओळखणंदेखील कठीण आहे. कारण त्याची मुख्य लक्षणं इतर स्ट्रेनपेक्षा वेगळी आहेत. अल्फा, बीटा आणि डेल्टा स्ट्रेनच्या तुलनेत ओमिक्रॉन प्रकाराचा संसर्ग झाल्यावर तुम्हाला वेगवेगळी लक्षणं दिसतील. डॉक्टर म्हणतात की, या प्रकाराची मुख्य लक्षणं म्हणजे थकवा, अंगदुखी आणि डोकेदुखी. आतापर्यंत रुग्णांमध्ये चव आणि वास कमी झाल्याची कोणतीही नोंद नाही. तथापि, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, वेगवेगळ्या लोकांना या प्रकाराची लागण झाल्यास भिन्न लक्षणं दिसू शकतात. दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर अँजेलिक कोएत्झी यांच्या मते, ओमिक्रॉन प्रकाराची मुख्य लक्षणं म्हणजे थकवा, अंगदुखी आणि डोकेदुखी. ही सामान्य सर्दीसारखी लक्षणं आहेत, ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात. ओमिक्रॉनचा पहिला बळी Covid-19 चा नवा अवतार (Coronavirus new variant) त्याचं भयंकर  रूप दाखवायला लागला आहे. ब्रिटनमध्ये Omicron ची लागण झालेला पहिला रुग्ण दगावल्याची नोंद झाली आहे. (UK reports first death with Omicron variant) ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. या देशात एप्रिलपर्यंत 75 हजार कोरोना मृत्यू होतील, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. त्यामुळे लवकरच पुन्हा Lockdown होण्याची शक्यता आहे. भारतात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आतापर्यंत महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 20 रुग्ण आढळले आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, लातूरमध्ये ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे. हे वाचा -  बॉलिवूडमधील कपूरनंतर खान कुटुंबातही कोरोना, सलमानची वहिनी पॉझिटिव्ह केंद्र सरकारने 11 डिसेंबरला दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) भारतातील पाच राज्यांमध्ये पसरला आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, कर्नाटक, दिल्लीमध्येही ओमिक्रॉनची प्रकरणं आहेत.  महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या