मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Omicron च्या रुग्णाचा ब्रिटनमध्ये मृत्यू; एप्रिलपर्यंत 75000 जीव घेणार कोरोना?

Omicron च्या रुग्णाचा ब्रिटनमध्ये मृत्यू; एप्रिलपर्यंत 75000 जीव घेणार कोरोना?

ब्रिटनमध्ये Omicron ची लागण झालेला पहिला रुग्ण दगावल्याची नोंद झाली आहे. ( UK reports first death with Omicron variant) ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Pm Boris) यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

ब्रिटनमध्ये Omicron ची लागण झालेला पहिला रुग्ण दगावल्याची नोंद झाली आहे. ( UK reports first death with Omicron variant) ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Pm Boris) यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

ब्रिटनमध्ये Omicron ची लागण झालेला पहिला रुग्ण दगावल्याची नोंद झाली आहे. ( UK reports first death with Omicron variant) ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Pm Boris) यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

लंडन, 13 डिसेंबर: Covid-19 चा नवा अवतार (Coronavirus new variant) त्याचं भयंकर  रूप दाखवायला लागला आहे. ब्रिटनमध्ये Omicron ची लागण झालेला पहिला रुग्ण दगावल्याची नोंद झाली आहे. (UK reports first death with Omicron variant) ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. या देशात एप्रिलपर्यंत 75 हजार कोरोना मृत्यू होतील, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. त्यामुळे लवकरच पुन्हा Lockdown होण्याची शक्यता आहे.

आयएएनएसच्या (IANS) बातमीनुसार, लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (LSSTM) आणि दक्षिण आफ्रिकेतल्या (South Africa) स्टेलनबोश विद्यापीठाच्या संशोधकांनी इंग्लंड सरकारला इशारा दिला आहे, की देशात कठोर उपाययोजना (Strigent Regulations) केल्या नाहीत तर येत्या 5 महिन्यांत म्हणजे एप्रिल 2022पर्यंत इंग्लंडमध्ये 25 हजार ते 75 हजार नागरिकांचा मृत्यू (Deaths) होऊ शकतो.

कोरोना पुन्हा मोठा संहार करणार! 4 महिन्यात ब्रिटनमध्ये 75000 मृत्यू होणार

इतर देशांच्या तुलनेत इंग्लंडमध्ये या विषाणूचा संसर्ग अत्यंत वेगाने वाढत असून, तिथे दररोज 600 हून अधिक रुग्ण आढळत आहेत. 11 डिसेंबरला इंग्लंडमध्ये 54 हजार 73नवीन रुग्ण आढळले. त्यात 633 ओमिक्रॉनग्रस्त होते. हे प्रमाण यापेक्षा जास्त असू शकतं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस (Booster Dose) घेतल्यास ओमिक्रॉनचा प्रभाव कमी होणं शक्य होईल. बूस्टर डोस घेतल्यानंतर रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागण्याची शक्यता 60 टक्के असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.'

ओमिक्रॉन व्हेरिएंट वर्षापूर्वीपासूनच अस्तित्वात? शास्त्रज्ञांच्या दाव्याने खळबळ

हा विषाणू इंग्लंडमध्ये पुन्हा नवीन लाट निर्माण करू शकतो आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा एकदा भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आणखी एका बूस्टर डोसची गरज असल्याचं मत संशोधकांनी व्यक्त केलं आहे.

WHO नेही दिला इशारा

जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील (WHO) र्व देशांना धोक्याचा इशारा दिला आहे. हा विषाणू लशीचा प्रभावदेखील कमी करू शकतो, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

चिंता वाढवणारी बातमी, Omicron चे सर्वाधिक रुग्ण आपल्याच राज्यात

सध्या या विषाणूमुळे गंभीर स्वरूपाचा आजार होण्याचं प्रमाण कमी आहे; मात्र सौम्य किंवा कसलीही लक्षणं न दिसणं यामुळे याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका अधिक आहे आणि संसर्ग अधिक वाढला तर डेल्टापेक्षाही याचं प्रमाण अधिक व्यापक होऊ शकते आणि तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असा इशारा आरोग्य संघटनेनं दिला आहे.

First published:

Tags: Coronavirus, United kingdom